शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
2
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
3
VIDEO: मी तुम्हाला बोलवलं नाहीये...; मुंबई विमानतळावर राडाच झाला, जसप्रीत बुमराह का चिडला?
4
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
5
ओलानं लाँच केला नवा प्रोडक्ट, शेअर्सला लागलं ५% अपर सर्किट; ₹५५ च्या पार पोहोचला भाव
6
दिवाळी २०२५: स्वप्नात महालक्ष्मीचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे भरभराट-भाग्योदय; शुभ-लाभ!
7
संरक्षण क्षेत्रात १० वर्षात उलाढाल ४६ हजार कोटी वरून दीड लाख कोटींवर; ३ लाख कोटींपर्यंत नेणार - राजनाथ सिंह
8
१३० नक्षलवादी आत्मसमर्पण करणार; अमित शाह यांच्या उपस्थितीत शस्त्रे जमा करणार
9
पीएम मोदींच्या महत्त्वाकांशी योजनेला ख्वाडा? जन-धन योजनेबाबत चिंताजनक बातमी, तुमचं खातं बंद होणार का?
10
EV चार्जिंगशी निगडीत कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; सोनू सूदशी निगडीत आहे कंपनी, ₹१२५ वर आला भाव
11
ताजमहलमधून सरकार एक दिवसांत किती कमाई करतं? तिकीट आणि इतर माहिती जाणून घ्या...
12
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांचे पाच पांडव: कुणी होता लष्करी अधिकारी, तर कुणी सोडली लाखोंची नोकरी
13
VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती
14
मुंबईत महिलेवर हल्ला केला आणि कोकणात जाऊन लपला, ४८ वर्षांनी झाली अटक, असा सापडला आरोपी
15
"पप्पांना मारलंय... "; लेकानेच केला खुनी आईचा पर्दाफाश; भाच्याच्या प्रेमात घेतला नवऱ्याचा जीव
16
Video - "मला माफ करा..."; तिकीट नाकारल्यानंतर ढसाढसा रडला नेता, व्यक्त केलं दु:ख
17
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
18
सासरेबुवा घरी घेऊन आले २ सूना; लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच झाल्या गायब अन्... समोर आलं धक्कादायक सत्य
19
Video : सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला, गॅलरीमध्ये रंगल्या गप्पा, भेटीचं कारण काय?
20
दर महिना ७० हजार सॅलरी पण हाती शिल्लकच राहत नाही; टेक प्रोफेशनल युवकानं शेअर केला अनुभव

साथ जीने मरने की कसमें खाल्ली अन् दुसरीशीच साखरपुडा उरकला.. तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 14:31 IST

लॉंग-डिस्टन्स रिलेशनशिपमधला हा दुरावा आधीच तिला सहन होत नव्हता त्यात सागरने दिलेल्या धोक्याने आगीत तेल ओतल्याचे काम केले. हा धोका सहन न झाल्याने तरुणीने झोपेच्या गोळ्या खाऊन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. 

ठळक मुद्देलॉंग-डिस्टन्स रिलेशनशिप झाली फेल

नागपूर : प्रेमात धोका मिळाल्याचा ताण सहन न झाल्याने तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तरुणीची प्रकृती धोक्याबाहेर असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सागर सतिश सदाफल (वय ३०) आणि २८ वर्षीय तरुणी आधी दोघेही एकाच महाविद्यालयात शिकत होते. एकाच भागात राहत असल्याने त्यांचे एकमेकांच्या घरी जाणे येते होते. दोघेही एकाच गाडीवर कॉलेजला जायचे. हळूहळू मैत्रीतून प्रेम फुलत गेले. दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या, घरच्यांना सांगितले. घरच्यांनीही नोकरी लागताच दोघांचे लग्न लावून देण्याचे मान्य केले. सर्वकाही सुरळीत सुरू होतं.

दोघांनाही नोकरी लागली. सागर शासकीय नोकरीत असून युवती खासगी कंपनीत आहे. दोघेही अभियंता आहेत. मात्र, दोघेही वेग-वेगळ्या ठिकाणी नोकरीवर असल्याने हळू-हळू त्यांच्यातील ताण वाढू लागला व खटके उडू लागले. दरम्यान, सागरने दुसऱ्या मुलीशी गुपचूप साक्षगंध उरकून टाकले. 

इकडे सागरसोबत संसाराची स्वप्न पाहत असलेल्या तरुणीला ही बाब समजताच ती खचून गेली. लॉंग-डिस्टन्स रिलेशनशिपमधला हा दुरावा आधीच तिला सहन होत नव्हता त्यात सागरने दिलेल्या धोक्याने आगीत तेल ओतल्याचे काम केले. हा धोका सहन न झाल्याने तरुणीने झोपेच्या गोळ्या खाऊन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. 

सुदैवाने वेळीच प्रकार लक्षात आल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. तरुणीची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे. ३० नोव्हेंबर रोजी पोलिसांनी मेडिकलमध्ये जाऊन तरुणीचे बयाण नोंदविले. प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिचा फायदा घेऊन बलात्कार केल्याचे तरुणीने सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातSocialसामाजिक