शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपनिरीक्षक महिलेची बलात्काराची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 21:14 IST

विक्रीकर अधिकारी असलेल्या प्रियकराने दुसरीकडे लग्न जुळविले तर, त्याने दगाबाजी केल्यामुळे केंद्रीय राखीव दलात (सीआरपीएफ) पोलीस उपनिरीक्षक असलेल्या प्रेयसीने बलात्काराचा आरोप लावून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला. आठ वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेमप्रकरणात कटुता निर्माण झाल्याने ही नाट्यमय घडामोड पुढे आली.

ठळक मुद्देआठ वर्षांच्या प्रेमप्रकरणात कटुता : विक्रीकर अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विक्रीकर अधिकारी असलेल्या प्रियकराने दुसरीकडे लग्न जुळविले तर, त्याने दगाबाजी केल्यामुळे केंद्रीय राखीव दलात (सीआरपीएफ) पोलीस उपनिरीक्षक असलेल्या प्रेयसीने बलात्काराचा आरोप लावून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला. आठ वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेमप्रकरणात कटुता निर्माण झाल्याने ही नाट्यमय घडामोड पुढे आली.प्रेयसी ३२ वर्षांची आहे तर आरोपीचे नाव संघरत्न गजभिये आहे. दोघेही नागपुरातील रहिवासी आहेत. आठ वर्षांपूर्वी ती गिट्टीखदानमध्ये पोलीस शिपायी म्हणून मुख्यालयात कार्यरत होती. दोघेही महत्त्वाकांक्षी होते. ते स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होते. एकत्र अभ्यास करायचे. त्यामुळे आधी ओळख आणि नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. पुढे गजभियेला विक्रीकर विभागात नोकरी लागली. तो मुंबईला रुजू झाला आणि नालासोपारा परिसरात राहायला गेला. ती देखिल सीआरपीएफमध्ये पीएसआय म्हणून रुजू झाली. सध्या ती पालघरला राहते. दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांच्यात नियमित शारीरिक संबंध प्रस्थापित व्हायचे. काही दिवसांपासून त्यांच्यात कटुता निर्माण झाली. वारंवार खटके उडू लागले. संबंधात वितुष्ट निर्माण आल्याने गजभियेने दुसऱ्या मुलीसोबत लग्न जुळविले. त्यामुळे प्रेयसीने पोलिसांकडे धाव घेतली. १३ एप्रिल २०११ ते १३ एप्रिल २०१९ असे तब्बल आठ वर्षे लग्नाचे आमिष दाखवून गजभियेने वारंवार शरीरसंबंध जोडले. त्याने आता दुसरीकडे लग्न जुळवून आपली फसवणूक केली आणि धमकी दिल्याचा आरोप तिने तक्रारीत लावला. त्यावरून गिट्टीखदान पोलिसांनी गजभियेविरुद्ध बलात्कार करून फसवणूक करणे, धमकी देणे आदी आरोपाखाली गुन्हा दाखल केला.तक्रार पालघरला, तपास गिट्टीखदानकडेबलात्काराचा आरोप लावणाऱ्या पीएसआयने पालघर ठाण्यात तक्रार नोंदवली. मात्र, सर्वांत पहिल्यांदा त्यांच्यात गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत शरीरसंबंध प्रस्थापित झाले होते. त्यामुळे पालघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण तपासासाठी गिट्टीखदान ठाण्यात पाठविले. कागदपत्रे उपलब्ध झाली असून आम्ही या प्रकरणाची चौकशी करीत असल्याचे गिट्टीखदानचे ठाणेदार सतीश गुरव यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWomenमहिलाPoliceपोलिसRapeबलात्कार