शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पोलीस कर्मचाऱ्याचा महिला पोलिसावर बलात्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:32 IST

मुख्यालयात कार्यरत पोलीस कर्मचाºयाने सोबत कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा बलात्कार केला. तब्बल दोन वर्षे शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर आता लग्नास नकार दिल्यामुळे हे प्रकरण ठाण्यात पोहचले. त्यामुळे शुक्रवारी रात्री या प्रकरणी मानकापूर ठाण्यात आरोपी पोलीस कर्मचारी पवनसिंग विनोदसिंग ठाकूर (वय २७) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.

ठळक मुद्देमानकापुरात गुन्हा दाखल : आरोपी फरार : पोलीस मुख्यालयात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यालयात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्याने सोबत कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा बलात्कार केला. तब्बल दोन वर्षे शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर आता लग्नास नकार दिल्यामुळे हे प्रकरण ठाण्यात पोहचले. त्यामुळे शुक्रवारी रात्री या प्रकरणी मानकापूर ठाण्यात आरोपी पोलीस कर्मचारी पवनसिंग विनोदसिंग ठाकूर (वय २७) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.आरोपी पोलीस ठाकूर आणि बलात्काराची तक्रार नोंदवणारी तरुणी (वय ३०) पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे. कर्तव्यावर असताना झालेल्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. १० फेब्रुवारी २०१६ ला ठाकूरने तिला आपले गोधनीतील सबिना सोसायटीत असलेले घर दाखवतो म्हणून सोबत नेले. तेथे त्याने तिच्यासोबत शरीरसंबंध जोडले. यानंतर दोघांमध्ये दोन वर्षात अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित झाले. लग्नाच्या आणाभाका घेणारे हे दोघे कधीकधी तरुणीच्या जरीपटक्यातील घरी जाऊनही शरीरसंबंध जोडू लागले. अलीकडे त्यांच्यात मतभेद झाले. लग्नाचा विषय काढताच तो टाळू लागल्याने त्यांच्यात ६ मे २०१८ ला कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतरही त्याने लग्न करावे म्हणून तरुणीने त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. त्याने लग्नाला स्पष्ट नकार दिल्यामुळे तरुणीने शुक्रवारी मानकापूर ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवणारी तरुणी पोलीस आणि आरोपी कर्मचारीही पोलीस असल्याने वरिष्ठांसोबत सल्लामसलत करून ठाणेदार महेश चव्हाण यांनी लगेच आरोपी ठाकूरविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.त्याची कुणकुण लागताच आरोपी पोलीस कर्मचारी फरार झाला. सध्या त्याची शेतकरी भवनात गार्ड ड्युटी लागली होती. तेथेही तो दोन दिवसांपासून गैरहजर असल्याचे समजते. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणामुळे पोलीस मुख्यालयात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिस