शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रिफन्ड व बोनसचे आमिष दाखवून महिलेला घातला दोन लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 19:39 IST

रिफन्ड आणि बोनसचे आमिष दाखवून एका महिलेला आरोपीने दोन लाखांचा गंडा घातला. दिव्या नरेंद्र हंसराजानी (वय ४८) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे.

ठळक मुद्देनिनावी फोनवर ठेवला विश्वास

आॅनलाईन लोकमतनागपूर : रिफन्ड आणि बोनसचे आमिष दाखवून एका महिलेला आरोपीने दोन लाखांचा गंडा घातला. दिव्या नरेंद्र हंसराजानी (वय ४८) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या आंबेडकर चौक, लकडगंजमध्ये राहतात.२२ नोव्हेंबर २०१७ ला त्यांना ०८७४३९०१६११ क्रमांकाच्या मोबाईलवरून फोन आला. मॅक्स लाईफ इन्शोरन्सचा हप्ता (किस्त) आपण इसिएसद्वारे अ‍ॅक्सीस बँकेतून न भरता दुस-या बँकेतून भरल्यास १० टक्के रक्कम परत मिळेल, असे फोन करणारा म्हणाला. त्याच्यावर विश्वास ठेवून दिव्या हंसराजानी यांनी आरोपीने सांगितलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या खाते क्र ६२९ ७०१० ०६२१७ १ लाख, ४६ हजार, ३९४ रुपये जमा केले. त्यानंतर त्याने बोनस जमा झाल्याची बतावणी करून बँक आॅफ बडोदा च्या खाते क्रमांक ०८४५०१ ०००००४२१ मध्ये ५४ हजार रुपये जमा करण्यास बाध्य केले. अशा प्रकारे २२ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०१७ च्या कालावधीत वेगवेगळळ्या मोबाईल क्रमांकावरून फोन करणा-या आरोपीने २ लाख, ३९४ रुपये जमा केल्यानंतर आरोपी पुन्हा वेगवेगळ्या नावाने हंसराजानी यांना रक्कम जमा करायला सांगू लागला. त्याचा संशय आल्याने त्यांनी आपल्या बँक आणि इन्शोरन्स खात्याची तपासणी केली असता आरोपीने फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीविरूध्द फसवणूक तसेच तंत्रज्ञानाच्या गैरवापराबाबतच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

 

 

टॅग्स :Crimeगुन्हा