शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गांधीजींच्या अनेक सत्याग्रहांचे साक्षीदार 'टिकेकर भवन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 22:28 IST

महात्मा गांधीजींचे नागपुरातील आणखी एक हक्काचे घर होते, ते म्हणजे धंतोलीतील टिकेकर भवन. टिकेकर बंगला या नावाने हे घर आजही सर्वपरिचित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महात्मा गांधीजी यांचे नागपूरशी अतूट नाते होते. सेवाग्रामचा आश्रम होण्यापूर्वीपासूनच ते नागपुरात सातत्याने येत असत. पूनमचंद रांका, जनरल मंचरशा आवारी यांच्या घरी त्यांचा मुक्काम असायचा. यासोबतच महात्मा गांधीजींचे आणखी एक हक्काचे घर होते, ते म्हणजे धंतोलीतील टिकेकर भवन. टिकेकर बंगला या नावाने हे घर आजही सर्वपरिचित आहे.

देशभक्त गणपतराव टिकेकर हे नागपुरातील श्रीमंतांपैकी एक होते. इंग्रजांच्या काळात रेल्वे कॉन्ट्रॅक्टर असलेले गणपतराव यांचे स्वांतत्र्यसंग्रामात भरीव योगदान होते. काँग्रेसला नागपुरात मजबूत करण्याचे काम त्यांनीच केले. नागपुरात प्रसिद्ध अजनी रेल्वे पूल, रेल्वे स्टेशनवरील पूल आणि मोक्षधाम घाटावरील रेल्वे पूल त्यांनीच तयार केला आहे.गणपतराव टिकेकर यांचे घर म्हणजे काँग्रेस वर्किंग कमिटीचे कार्यालयच होते. त्यामुळे त्यांच्या घरी पं. मोतीलाल नेहरू, मीरा बेन, लाला लजपत राय, सरदार पटेल, सरोजिनी नायडू, राजेंद्र प्रसाद, विनोबा भावे, नेताजी सुभाषचंद्र बोस, चित्तरंजन दास, खान अब्दुल गफार खान (सरहद गांधी), आचार्य विनोबा भावे,आदींसह महात्मा गांधी आणि कस्तुरबांचे वास्तव्य असायचे. दरम्यान देशभरात गाजलेला जंगल सत्याग्रह असो की, झेंडा सत्याग्रह, असहयोग आंदोलन असो की मिठाचा सत्याग्रह या आंदोलनाच्या पूर्वीची चर्चा टिकेकर भवनातच रंगायची.बकरीचे दूध आणि उकडलेले खाद्यपदार्थमहात्मा गांधीजी टिकेकर भवनात एकूण चार वेळा थांबले. दोनदा एक-एक महिन्यासाठी तर दोनदा १५-१५ दिवसांचा मुक्काम होता. त्यांच्यासोबत कस्तुरबा गांधी आणि ४० ते ५० नेते-कार्यकर्ते राहायचे. वरच्या माळ्यावर सर्वांची राहण्याची व्यवस्था असायची. महात्मा गांधीजी बकरीचे दूध प्यायचे. त्यामुळे बंगल्यातच ५० बकऱ्या आणून ठेवण्यात आल्या होत्या. याशिवाय उकडलेले खाद्यपदार्थ त्यांना खाऊ घालण्यात येत असत.सुवर्णदानकाँग्रेसच्या मदतीसाठी महात्मा गांधीजींना सुवर्णदान देण्याचा कार्यक्रम बंगल्याच्या गच्चीवरच आयोजित करण्यात आला. यावेळी गणपतरावजींच्या पत्नीसह बॅरिस्टर अभ्यंकरांच्या पत्नीनेही आपले सोन्याचे कडे दान दिले होते.खादी भंडार आणि टिळक विद्यालयाला जागा दानगणपतराव टिकेकर हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. सीताबर्डी येथील त्यांनी आपला एक प्लॉट खादी ग्रामोद्योग भंडारसाठी दिला. त्याचे उद्घाटन गांधीजींच्या हस्ते करण्यात आले. तसेच धंतोली येथील जागाही शाळेला दान दिली. त्या ठिकाणी टिळक महाविद्यालय उभे आहे. या शाळेचे उद्घाटनही महात्मा गांधीजींच्या हस्ते करण्यात आले.मिठाचा सत्याग्रहमहात्मा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह पुकारला होता. सरोजिनी नायडू नागपुरात आल्या होत्या. त्यांनी समुद्राचे पाणी आणले होते. टिकेकर भवनातच त्या पाण्याचे मीठ तयार करण्यात आले. या मिठाच्या पुड्या तयार करून एक पुडी ५०० रुपयाप्रमाणे विकण्यात आली. गणपतरावजींनी त्याची जबाबदारी उचलली. तो पैसा आंदोलनाला मदत करण्यासाठी देण्यात आला.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीnagpurनागपूर