शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याविना मेडिकलमधील रुग्णांचे हाल होणार; ‘ओसीडब्ल्यू’ने दिला तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहण्याचा सूचना

By सुमेध वाघमार | Updated: February 9, 2024 20:00 IST

मेडिकलला दरदिवशी १८ ते २२ लाख लिटर पाण्याची गरज असताना ‘ओसीडब्ल्यू’कडून रोज चार ते पाच लिटर पाणी कमीच मिळ असल्याची तक्रार आहे.

नागपूर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) मागणीच्या तुलनेत कमी पाणी मिळत असताना ‘ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स’कडून (ओसीडब्ल्यू) १२ ते १४ फेब्रवारी, सलग तीन दिवस पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्याचा सूचना आहेत. त्यामुळे मेडिकल प्रशासन अडचणीत आले आहे. पाणी साठवून तरी किती ठेवणार हा प्रश्न आहे. परिणामी, रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांचे हाल होण्याची शक्यता आहे.

मेडिकलला दरदिवशी १८ ते २२ लाख लिटर पाण्याची गरज असताना ‘ओसीडब्ल्यू’कडून रोज चार ते पाच लिटर पाणी कमीच मिळ असल्याची तक्रार आहे. रोज पाणी टंचाईला मेडिकल तोंड देत असताना पाईपलाईन दुरुस्तीच्या नावाखाली पुढील आठवड्यातील सोमवारी १० वाजेपासून ते बुधवारपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती आज दूरध्वनीवरून मनपा पाणीपुरवठा अधिकारी अजय घरजाडे यांनी मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांना दिली. त्यांनी याबाबत लेखी पत्राची मागणी केली. पत्र आल्यावरच आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे डॉ. गावंडे यांनी सांगितले. 

दोन दिवस जास्तीचा पाणीपुरवठा‘लोकमत’शी बोलताना घरजाडे म्हणाले, दुरुस्तीसाठी मेडिकलचा पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. तसे नियोजन केले जात आहे. या बाबतच्या तोंडी सूचना मेडिकलला देण्यात आल्या आहेत. लवकरच लेखी सुद्धा कळविण्यात येईल. १२ फेब्रुवारी सकाळी १०वाजतापासून तर पढील ४८ तास दुरुस्तीचे काम चालणार आहे. यामुळे पाणीपुरवठा बंद राहिल. त्यापूर्वी दोन दिवस जास्तीचा पाणीपुरवठा केला जाईल. मेडिकलने हे पाणी स्टोअर करावे, यासाठी या सूचना देण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा बंदच्या दिवशी गरज पडल्यास टॅँकरने पाणीपुरवठा केला जाईल. रुग्णालय प्रशासनाने या दिवसांत काटकसर करून पाण्याचा वापर करावा, असेही ते म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरWaterपाणी