शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक संघटनेशिवाय राजकारण अशक्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 23:48 IST

आम्ही समाजाला नाही बनवत तर समाज आम्हाला बनवितो. कार्यकर्त्यांनी पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर चालू नये, असे मत मनोज बंड यांनी व्यक्त केले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महावीरनगरातील सैतवाळ जैन संघटन मंडळ युवा शाखेतर्फे पर्युषण पर्वानिमित्त ‘समाजकारण व राजकारण’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून अभिनंदन पळसापुरे हे उपस्थित होते. याशिवाय पुलक मंच परिवाराचे राष्ट्रीय सांस्कृतिक मंत्री मनोज बंड, करिअर मोटिव्हेटर डॉ. नरेन्द्र भुसारी, अखिल दिगंबर सैतवाळ संस्थेचे विदर्भ विभागीय सचिव राजेन्द्र नखाते, प्रशांत मानेकर उपस्थित होते.राजकारण व समाजकारण या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. व्यक्तीची सुरुवात समाजसेवेपासून होते तर शेवट राजकारणाने होतो. समाजसेवेत कार्यकर्ता हा कार्यकर्ताच असतो, तो कधीच माजी कार्यकर्ता होत नाही. समाजसेवेची आवड लहानपणापासून असली पाहिजे. आपण समाजाचे पुढारी, पदाधिकारी बनलो व त्यानंतर पन्नास-शंभर कार्यकर्ते मिळाले तेव्हा त्याच्या मनात येते मी समाजाचा पुढारी झालो, आता कार्यकर्त्यांनी माझे ऐकले पाहिजे. या विचारापासून समाजात राजकारणाची सुरुवात सध्या होते आहे. आता समाजात माझी चलती राहील. आम्ही समाजाला नाही बनवत तर समाज आम्हाला बनवितो. कार्यकर्त्यांनी पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर चालू नये, असे मत मनोज बंड यांनी व्यक्त केले. जोपर्यंत सामाजिक संघटन मजबूत नसेल तोपर्यंत राजकारणावर कोणताही फरक पडणार नाही. समाजाने आपला पुढारी निवडल्यावर त्याला संघटित होऊन पूर्ण सहकार्य केले तर तो राजकारणात प्रभावी कार्य करू शकतो. सामाजिक संघटनेशिवाय राजकारण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन अभिनंदन पळसापुरे यांनी केले. डॉ. नरेन्द्र भुसारी, राजेन्द्र नखाते, प्रशांत मानेकर यांनीही आपले मत मांडले. कार्यक्रमाचे संचालन नीरज पळसापुरे यांनी तर सिद्धांत नखाते यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सैतवाळ जैन संघटन मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत वेखंडे, प्रकाश मारवडकर, सुभाष मचाले, विनय बंड, प्रशांत सवाने, श्रीकांत मानेकर, विशाल चानेकर, रमेश तुपकर, शरद वेखंडे, धीरज बंड, संयम भुसारी, निखील पळसापुरे, अभिषेक बंड, चैतन्य महाजन उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकPoliticsराजकारण