लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’पासून बचाव व्हावा यासाठी उपराजधानीतील बहुतांश नागरिक व विशेषत: दुचाकीस्वारांकडून ‘मास्क’ घालण्यात येत असल्याचे चित्र आहे. मात्र ‘कोरोना’शी बचाव करत असताना अपघातापासूनदेखील बचाव करणे तितकेच महत्त्वाचे आहे याचा बहुदा अनेकांना विसर पडला आहे. ‘लोकमत’ने शहरातील विविध चौकांमध्ये केलेल्या ‘रिअॅलिटी चेक’मध्ये ‘हेल्मेट’प्रति दुचाकीस्वारांची उदासीनता दिसून आली आहे. अनेक दुचाकीस्वार विना ‘हेल्मेट’च वाहन चालवत असून यासंदर्भात त्यांना जबाबदारीचे भान नसल्याचे चित्र आहे.नागपुरात ‘हेल्मेट’ सक्ती अनेक दिवसांपासून आहेच. शिवाय ‘कोरोना’ काळात शहरात अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात ५ ऑगस्टपासून विविध वाहनात प्रवासी नेण्यासाठी सूट देण्यात आली आहे. दुचाकी चालकासोबत १ जण प्रवास करू शकण्यास मुभा देण्यात आली असून हेल्मेट व मास्क घालणे अनिवार्य आहे. या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते.‘लोकमत’च्या चमूने शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये पाहणी केली असता ही धक्कादायक बाब समोर आली आहे. कधी ‘ट्रिपल सीट’ कधी विना ‘हेल्मेट’ वाºयाच्या वेगाशी स्पर्धा करताना मृत्यूलाच आमंत्रण देण्याचा प्रकार सर्रास पहायला मिळाला. काही चौकांमध्ये तर वाहतूक पोलीस ‘मास्क’ नसलेल्यांवर कारवाई करत होते. मात्र ‘हेल्मेट’ न घातलेल्यांना साधी विचारणादेखील होत नव्हती.प्रतापनगर, शंकरनगर चौकप्रतापनगर, शंकरनगर चौकात ‘लोकमत’च्या चमूने पाहणी केली असता अनेक जण विना ‘हेल्मेट’चेच दिसून आले. या चौकात सतत वाहतूक पोलीस तैनात असतात. मात्र कुणावरही कारवाई होत नव्हती.पोलीस दादा, तुम्हीसुद्धा!
विना ‘हेल्मेट’ होईल मृत्यूचा ‘चेकमेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 20:01 IST
‘कोरोना’पासून बचाव व्हावा यासाठी उपराजधानीतील बहुतांश नागरिक व विशेषत: दुचाकीस्वारांकडून ‘मास्क’ घालण्यात येत असल्याचे चित्र आहे. मात्र ‘कोरोना’शी बचाव करत असताना अपघातापासूनदेखील बचाव करणे तितकेच महत्त्वाचे आहे याचा बहुदा अनेकांना विसर पडला आहे.
विना ‘हेल्मेट’ होईल मृत्यूचा ‘चेकमेट’
ठळक मुद्दे‘मास्क’सोबत ‘हेल्मेट’ घालण्याबाबत उदासीनताजागोजागी नियमांचे उल्लंघन : पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष