शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पेपरफुटी विरोधातील कायद्याची घोषणा हवेतच; आश्वासनाला चार महिने उलटले

By दीपक भातुसे | Updated: December 12, 2023 05:39 IST

प्रारूप ठरविण्यासाठी समितीही नाही

दीपक भातुसेनागपूर : शासकीय नोकरभरतीच्या परीक्षांमध्ये होणाऱ्या पेपरफुटी, कॉपी, तसेच इतर गैरप्रकारांना पायबंद घालण्यासाठी कडक कायदा करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. हिवाळी अधिवेशनात कायदा येईल, अशी आशा उमेदवारांना होती. मात्र, चार महिने उलटूनही कायद्याचे प्रारूप तयार करण्याबाबतची समितीही अजून स्थापन झालेली  नाही. त्यामुळे हा कायदा करणार कधी, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. 

उत्तराखंड आणि झारखंडसारख्या राज्यांनी याबाबत कडक कायदा केला आहे. आपल्या राज्यातही असा कडक कायदा झाला तर नोकरभरतीच्या परीक्षांमधील गैरप्रकार टळतील आणि प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, अशी भावना या विद्यार्थ्यांची आहे. 

 यासंदर्भात आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने गत ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनीही पेपरफुटी विरोधातील कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. 

झारखंडने केला कडक कायदा 

झारखंड सरकारच्या कायद्यानुसार स्पर्धा परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडल्यास १० कोटी रुपये दंड आणि जन्मठेपेपर्यंतची शिक्षा अशी तरतूद आहे. 

स्पर्धा परीक्षेत फसवणूक करताना उमेदवार पकडला गेल्यास त्याला एक वर्षाचा तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे, तर दुसऱ्यांदा पकडल्यास तीन वर्षांचा कारावास आणि १० लाख रुपयांच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन चार महिने काही होत नसेल तर अधिकाऱ्यांवरच कारवाई व्हायला हवी. याबाबत पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. 

- बच्चू कडू, आमदार, प्रहार जनशक्ती पक्ष  

सरळसेवेच्या पदभरतीत पेपर फुटत आहेत, घोटाळे होत आहेत. याला आळा घालण्यासाठी उत्तराखंड, झारखंडच्या धर्तीवर पेपरफुटीचा कायदा आणून त्यात कडक शिक्षा असायला हवी. - महेश बडे, स्टुडंटस् राइटस् असोसिएशन

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन