शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

वादळी पावसाने धान जमीनदोस्त

By admin | Updated: November 18, 2014 00:54 IST

मौदा तालुक्यातील काही भागात रविवारी सायंकाळी वादळासह पावसाच्या सरी कोसळल्या. या वादळामुळे कापणीला आलेले धानाचे पीक जमीनदोस्त झाले आहे. पावसामुळे धानाची अर्थात

शेतकरी संकटात : तांदळाची प्रत खालावण्याची शक्यतातारसा / कोदामेंढी : मौदा तालुक्यातील काही भागात रविवारी सायंकाळी वादळासह पावसाच्या सरी कोसळल्या. या वादळामुळे कापणीला आलेले धानाचे पीक जमीनदोस्त झाले आहे. पावसामुळे धानाची अर्थात तांदळाची प्रत खालावण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडले आहेत.धान हे मौदा तालुक्यातील नगदी पीक होय. सध्या हलक्या वाणाचे धानाचे पीक कापणीला आले आहे. काही ठिकाणी कापणीला सुरुवातही करण्यात आली. रविवारी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजताच्या दरम्यान तारसा व परिसरातील शिवारांमध्ये जोरदार वादळासह पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे तारसा, निमखेडा, बानोर, इसापूर, धनी, वीरशी, नवेगाव आष्टी, बाबदेव, चाचेर, नेरला, नंदापुरी, बारशी यासह अन्य ठिकाणचा धान अक्षरश: जमीनदोस्त झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक ऐनवेळी हिरावण्याची शक्यता बळावली आहे. कोदामेंढी परिसरात रविवारी सायंकाळी वादळासह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे या परिसरातील धानाच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. सध्या या परिसरातील धानाचे पीक अंतिम टप्प्यात आहे. हा धान हल्ली कापणीला आला असला तरी, जवळपास ९० टक्के धानाचे पीक शेतातच आहे. काहींनी कापणी केली असून, धानाच्या पेंड्या बांध्यातच पडल्या आहेत. रविवारी सायंकाळी कोसळलेल्या पावसाच्या सरींमुळे या पेंड्या भिजल्या असून, वादळामुळे शेतातील कापणीला आलेला उभा धान आडवा झाला आहे. या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका कोदामेंढी, अरोली, तुमान, तरोडी, सावंगी शिवाडौली, तांडा, महालगाव, पिंपळगाव, वायगाव, मुरमाडी, सुकळी, खिडकी, तोंडली, वाकेश्वर, श्रीखंडा, इंदोरा, नांदगाव, खरडा, बेरडेपार, खंडाळा, भांडेवाडी, अडेगाव, बोरी (घिवारी), वाघबोडी, कथलाबोडी, धानोली शसह अन्य शिवारातील धाना पीकाला जबरदस्त फटका बसला आहे.या परिसरात धानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, कृषी अथवा महसूल विभागाच्या एकाही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने नुुकसानग्रस्त शेतांची साधी पाहणी केली नाही, असे या परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)