शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा, नगरपालिका, नगर पंचायतींच्या निवडणुकांचा बार आता दिवाळीनंतरच ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 18:15 IST

प्रभागरचनेच्या कार्यक्रमात महिन्याची वाढ : इच्छुकांची प्रतीक्षा लांबली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका व नगरपालिकांच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आजी-माजी नगरसेवकांसह इच्छुकही सक्रिय झाले आहेत. नागरिकांशी संपर्क वाढवला जात आहे. कार्यक्रमानुसार दिवाळीच्या आसपास या निवडणुका होतील, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, अंतिम प्रभागरचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. तसा शासनादेश काढला आहे. याचा विचार करता नव्या वर्षातच महापालिका निवडणुकीचा मुहूर्त निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नागपूर महापालिकेत साडेतीन वर्षापासून प्रशासक कार्यरत आहे. कमीअधिक प्रमाणात हीच परिस्थिती जिल्ह्यातील १५ नगरपालिका व १४ पैकी काही नगरपंचायतींची आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने निवडणूक प्रक्रिया रखडली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने महापालिका निवडणूक घेण्याचे निर्देश कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 

चार सदस्यांचा प्रभागाचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नोटिफिकेशन काढण्यात आले होते. त्यानुसार ११ जूनपासून प्रगणक गटाची मांडणी, गुगल मॅपवर नकाशे तयार करणे, ३१ जुलैला प्रभागरचनेचा मुसदा तयार करणे, २२ ऑगस्ट रोजी प्रभागरचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागवणे, ९ सप्टेंबरला प्रभागरचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास सादर करणे, त्यानंतर २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर निवडणूक आयोगाने अंतिम केलेल्या प्रभागरचनेच्या अधिसूचनेस प्रसिद्धी असा कार्यक्रम आखून दिला होता.

मात्र आता अंतिम प्रभागरचना अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी ३ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर अशी जवळपास एक महिन्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. दरम्यान भाजपने 'मोदी सरकार ग्यारह साल बेमिसाल' या माध्यमातून महापालिका निवडणुकांची तयारी चालवली आहे. ४०० सभा व बैठका घेण्याचे नियोजन केले आहे. पक्ष संघटनेत मोठे बदल केले. आहेत. उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. महापालिकेने अचानक रस्ते झाडून स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. असे असले तरी डिसेंबर महिन्यात विधिमंडळाचे अधिवेशन बघता निवडणुकांचा मुहूर्त नव्या वर्षात निघेल, असा तर्क लावला जात आहे.

ठळक मुद्दे

  • १२ जून रोजी प्रसिद्ध वेळापत्रकात बदल
  • प्रभागरचनेच्या टप्प्यांमध्ये कालावधी वाढ
  • अंतिम प्रभागरचना अधिसूचना आता ६ ऑक्टोबर रोजी
  • निवडणुका किमान दोन महिने उशिरा
टॅग्स :nagpurनागपूर