शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार : नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 20:56 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संपूर्ण देशात नावलौकिक आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या विद्यापीठाची जमीन आहे, मात्र जमिनीचा लिलाव होत असल्याची माहिती दुर्दैवी आहे.

ठळक मुद्देकृषी पदवीधारक आमदारांचा सत्कार : अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रोइंजि. मित्र परिवारचा पुढाकार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संपूर्ण देशात नावलौकिक आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या विद्यापीठाची जमीन आहे, मात्र जमिनीचा लिलाव होत असल्याची माहिती दुर्दैवी आहे. या जमिनीचे रक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे कृषी संशोधनाचे कार्य अधिक विस्तारित व्हावे व विद्यापीठाचा विकास व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलून आर्थिक तरतूद करण्यास सांगणार असल्याचा विश्वास विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रोइंजिनीअर्स मित्र परिवाराच्या वतीने कृषी पदवीधारक आमदारांचा सत्कार समारंभ आज पंजाबराव देशमुख स्मृती स्मारक परिसराच्या आवारात आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कृषी मंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री अनिल देशमुख, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, रजिस्ट्रार प्रकाश कडू, माजी कुलगुरू शरद निंबाळकर, दिलीप चौधरी, देवानंद पंचभाई, संघटनेचे अध्यक्ष दिलीप मोहितकर, सचिव प्रणय पराते, डॉ. सुनील सहतपुरे, मिलिंद राऊत आदी उपस्थित होते. यावेळी आमदार अशोक पवार, मनोहर चंद्रिकापुरे, श्यामसुंदर शिंदे, सुलभा खोडके, शेखर निकम, शिरीष चौधरी या कृषी पदवीधारक आमदारांचा सत्कार करण्यात आला.नाना पटोले पुढे म्हणाले, नवीन पिढी शेतीपासून दूर जात आहे, हे वाईट चित्र आहे. त्यामुळे लौकिक असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला शेतकऱ्यांना नवीन संशोधनाचा, नवीन तंत्रज्ञानाचा फायदा मिळवून देण्यासोबतच, तरुण पिढीला शेतीकडे वळवण्याचे महत्त्वाचे काम करावं लागेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. संघटनतर्फे विद्यार्थी व शेतकऱ्यांकरिता खुले अध्ययन केंद्र उभारण्याकरिता आर्थिक साहाय्य करण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कृषिमंत्री सुभाष देसाई यावेळी म्हणाले, सध्या शेती हा राज्यासमोरील गंभीर प्रश्न आहे. शेती आणि शेतकºयांच्या परिस्थितीत बदल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार केला पाहिजे. यासाठी हे सुशिक्षित शेतकरी आमदार राज्यातील शेतकºयांना मार्गदर्शन करण्याचा विडा उचलतील, अशी अपेक्षा देसाई यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राला निश्चित विकासाच्या मार्गावर पुढे नेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता मी न्यायाधीश आहे : पटोलेशेतीचे, बेरोजगाराचे प्रश्न उचलल्याने आता विधानसभा अध्यक्ष म्हणून संधी मिळाली. पण मी आता कोणत्या पार्टीचा नेता नाही तर न्यायाधीशाच्या भूमिकेत आहे, त्यामुळे सगळ्यांचे ऐकून घ्यावे लागते. महाराष्ट्र हे बेरोजगारांचे राज्य झाले आहे आणि बेरोजगार तरुणांना न्याय देणे गरजेचे आहे. हे सरकार त्यांचे प्रश्न सोडवेल व महाराष्ट्राला पुन्हा पुढे नेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेagricultureशेतीuniversityविद्यापीठ