शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

"मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेणार, पण ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही"

By कमलेश वानखेडे | Updated: September 11, 2023 13:42 IST

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन : दोन समाज आमोरा समोर येतील असा निर्णय घेणार नाही

नागपूर : ओबीसी समाजात भिती आहे की आमचे आरक्षण कमी होणार, पण सरकारचा असा कुठलाही हेतू नाही. ओबीसी समाजाने कुठलाही गैरसमज करुन घेऊ नये. आमच्या सरकारच्या वतीने आम्ही ओबीसी समाजाला आश्वस्त करतोय की काहीही झाले तरी सरकार ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नागपुरात आश्वस्त केले.

फडणवीस म्हणाले, राज्यात जेव्हा समाजाचे प्रश्न निर्माण होतात, तेव्हा हे प्रश्न समाजाच्या पलीकडे असतात. त्यामुळे सगळ्यांनी मिळून समाजाच्या हिताचा निर्णय घ्यायचा असतो. दोन समाज आमोरा समोर येतील, असा कुठलाही निर्णय सरकार घेणार नाही. आजच्या मुंबईतील बैठकीत सर्वानुमते पुढे जाण्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानिमित्ताने मराठा समाजाचे काही प्रश्न ऐरणीवर आहे. त्यांच्या मागण्या आहेत, तशा इतरही समाजाच्या मागण्या आहेत.

जरांगे पाटील यांच्याशी बोलून मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे शेवटी कायद्याचा विचार करावा लागतोय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विचार करावा लागतोय. प्रश्न सोडवायचा असेच तर कायद्याच्या चौकटीत टिकलेही पाहिजे. अन्यथा समाज म्हणेल आमची फसवणुक केलीय. त्यामुळे सर्वांनी मिळून यावर काय मार्ग काढता येईल हा प्रयत्न केला जाईल. सगळ्यांनी मिळून सकारात्मक विचार केला तर समाजाचेही भले होईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जाती