शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

१५ ऑगस्टला विद्यार्थी नवीन गणवेशात दिसतील का?

By गणेश हुड | Updated: July 6, 2024 18:59 IST

शिक्षकांची चिंता वाढली : चारच तालुक्यात कापड उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :  यावर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना मोफत गणवेश उपलब्ध करून दिला जाईल ही शालेय शिक्षण विभागाची घोषणा फोल ठरली आहे. १ जुलैला शाळा सुरू झाल्या परंतु आता कटींग केलेले कापड उपलब्ध केले जात आहे. सध्या चार तालुक्यांसाठी नियमित गणवेशाचे तर तीन तालुक्यांना स्काऊड गाईट गणवेशाचे कापड आले आहे. अद्याप सर्व तालुक्यांना कापड मिळालेले नाही. त्यामुळे १५ ऑगस्टला तरी विद्यार्थी नवीन गणवेशात दिसतील का असा प्रश्न पालकांना पडला आहे.  दुसरीकडे अद्याप सर्व तालुक्यांना कापड उपलब्ध न झाल्याने शिक्षकांचीही चिंता वाढली आहे. 

नागपूर जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या  जवळपास ८० हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी गणवेश न मिळाल्याने विद्यार्थी जुन्या गणवेशात येत आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर चार  दिवसांनी जिल्ह्यातील सात  तालुक्यांमध्ये गणवेशाचे कापड पोहोचले. नियमित गणवेशाचे कापलेले कापड ४ तालुक्यात तर स्काऊट-गाईट गणवेशाचे न कापलेले कापड तीन तालुक्यात पोहोचल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. अद्याप नऊ तालुक्यात नियमित तर दहा  तालुक्यात स्काऊड गाईड गणवेशाचे कापड पोहचलेले नाही. गणवेश शिवण्याचे काम  महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) महिला बचत गटामार्फत केले जाणार आहे. गणवेश शिलाई आणि तयार झाल्यावर ते केंद्रीय स्तरावर पाठवले जातील. तेथून ते संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना आपापल्या शाळेत नेण्यासाठी वितरित केले जाईल. परंतु गणवेश विद्यार्थ्यांना व्यवस्थित होईल की नाही याबाबतही शंका आहे. 

एका गणवेशाच्या शिलाईसाठी १०० रुपये स्काऊटच्या गणवेशाचे कापड हिंगणा, काटोल, नरखेड या तालुक्यांमध्ये पोहोचवण्यात आले. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कापड मंजूर केले. विद्यार्थी संख्येनुसार तहसील स्तरावरील शाळांना कापड पाठवले जाईल. शाळा व्यवस्थापन समितीला स्थानिक टेलर किंवा महिला बचत गटाकडून गणवेश शिवून घ्यावा लागेल. संपूर्ण शिक्षा अभियानाशी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या बँक खात्यात प्रति गणवेश १०० रुपये शिलाई शुल्काची रक्कम जमा केली जाईल. परंतु ही रक्कम कमी असल्याचे बचत गटांचे म्हणने आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रzp schoolजिल्हा परिषद शाळाnagpurनागपूर