शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
2
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
3
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
4
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
5
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
6
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
7
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
8
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
9
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
10
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
11
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
12
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
13
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
14
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
15
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
16
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
17
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
18
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
19
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
20
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

नागपूर रेल्वेस्थानक कधी होणार स्मार्ट?

By admin | Updated: May 19, 2017 02:51 IST

विकासात उपराजधानीत आगेकूच करीत असताना नागपूर रेल्वेस्थानक मात्र स्वच्छतेच्या बाबतीत ढांग ठरले

स्वच्छता पुरस्कारात पिछाडी : प्रशासनाची उदासीनता कारणीभूत लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विकासात उपराजधानीत आगेकूच करीत असताना नागपूर रेल्वेस्थानक मात्र स्वच्छतेच्या बाबतीत ढांग ठरले असून चंद्रपूर, बल्लारशा, वर्धा रेल्वेस्थानकाने बाजी मारून नागपूर रेल्वेस्थानकावर मात केल्याचे स्पष्ट झाले आहे. क्वालिटी कंट्रोल आॅफ इंडियाने देशभरातील ४०७ रेल्वेस्थानकांवर स्वच्छतेबाबत सर्वेक्षण केले. यात नागपूर रेल्वेस्थानकाचा २३७ वा क्रमांक आला असून वर्धा रेल्वेस्थानक ३९ व्या क्रमांकावर, चंद्रपूर ३८ वा क्रमांक, बल्लारशा स्थानकाला ३३ वा क्रमांक मिळाला आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर असलेल्या अस्वच्छतेमुळे या सर्वेक्षणात नागपूरला अव्वल स्थान मिळू शकलेले नाही. रेल्वेस्थानकाच्या स्वच्छतेच्या बाबतीत रेल्वे रुळ, डस्टबीन, शौचालय हे निकष ठेवण्यात आले होते. नागपूर रेल्वेस्थानकावर या तिन्ही बाबीत कमालीची अस्वच्छता असून त्याबाबत नेहमीच प्रसार माध्यमातून टीकाही करण्यात येते. परंतु अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे या बाबीत कोणतीही सुधारणा आजवर होऊ शकलेली नाही. नागपूरचा नावलौकिक वाढविण्यासाठी आणि प्रवाशांना स्वच्छ रेल्वे परिसर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने वेळीच पावले उचलून रेल्वेस्थानकावरील स्थिती नियंत्रणात आणण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रवाशांचे योगदानही महत्त्वाचे रेल्वे प्रशासनासोबत रेल्वे प्रवाशांनीही स्वच्छतेचे नियम पाळून रेल्वेगाड्या, रेल्वेस्थानकाचा परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. परंतु अनेक प्रवासी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. केळीची साले प्लॅटफार्म रेल्वे रुळावर फेकणे, शौचालयात पाण्याच्या बॉटल टाकणे, खर्रा, पान खाऊन पिचकाऱ्या मारणे आदी प्रकार करून रेल्वेस्थानकाला अवकळा प्राप्त करून देण्यात प्रवाशांचाही मोठा हातभार आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपली जबाबदारी ओळखून रेल्वे परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. खासगीकरणामुळे वाईट स्थिती रेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानक परिसराच्या सफाईचे कंत्राट खासगी कंत्राटदाराला दिले आहे. त्यामुळे कंत्राटदार पैसे वाचविण्यासाठी कमी मनुष्यबळ कामावर ठेवणे, कामावरील कामगारांना कमी वेतन देणे यासारखे प्रकार करतो. त्यामुळे दिवसेंदिवस रेल्वेस्थानकाच्या स्वच्छतेचा मुद्दा गंभीर बनत चालला आहे. या कंत्राटदारांवर रेल्वे प्रशासनाचा कुठलाच अंकुश राहिलेला नसल्यामुळे रेल्वेस्थानक स्वच्छतेच्या बाबतीत पिछाडले आहे.