शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्या कात टाकणार का? केंद्र शासनाचा अध्यादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 12:44 IST

केंद्राने ‘ई-नाम’ (ऑनलाईन नॅशनल अ‍ॅग्रीकल्चर मार्केट अर्थात ऑनलाईन राष्ट्रीय कृषी बाजार) सुरू केले आहे. त्यामुळे बाजार समित्यांनी ‘सेस’च्या रुपात मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून न राहता स्वतंत्र व्यापारी म्हणून बाजारात उतरणे आवश्यक असल्याचे जाणकार व्यक्तींनी सांगितले.

ठळक मुद्देसंचालक मंडळात असंतोष

सुनील चरपेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र शासनाने ५ जून २०२० रोजी अध्यादेश जारी करीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांना त्यांच्या मार्केट यार्डबाहेर शेतमालाच्या खरेदी-विक्रीवर ‘सेस’ वसूल करण्यावर बंदी घातली. आर्थिक उत्पन्न कमी होणार असल्याने बाजार समित्यांच्या संचालक मंडळात असंतोष निर्माण झाला आहे. केंद्राने ‘ई-नाम’ (ऑनलाईन नॅशनल अ‍ॅग्रीकल्चर मार्केट अर्थात ऑनलाईन राष्ट्रीय कृषी बाजार) सुरू केले आहे. त्यामुळे बाजार समित्यांनी ‘सेस’च्या रुपात मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून न राहता स्वतंत्र व्यापारी म्हणून बाजारात उतरणे आवश्यक असल्याचे जाणकार व्यक्तींनी सांगितले.

जिल्ह्यात एकूण १३ कृषी उत्पन्न बाजार समित्या कार्यरत आहेत. बाजार समित्या शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी असल्या तरी त्या शेतकऱ्यांची बाजू घेत नाहीत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. बाजार समित्यांमुळे शेतमालाच्या बाजारपेठेवर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. नव्या अध्यादेशामुळे या मर्यादा कमी झाल्या आहेत. शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल देशात कुठेही विकण्याची मुभा मिळणार आहे. शेतमाल विक्रीचे स्वातंत्र्य मिळणार असल्याने शेतमालाच्या बाजारात स्पर्धा निर्माण होणार असल्याचे शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष राम नेवले यांनी सांगितले.

बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा आरोप नरखेड येथील राजेंद्र बालपांडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केला आहे. बाजार समितीचे संचालक मंडळ व व्यापारी यांचे संगनमत असते. मार्केट यार्डमध्ये शेतमाल झाकण्यासाठी शेतकऱ्यांना पाटपत्र्या दिल्या जात नाही. वेळेवर चुकारे मिळत नाही. उधारीत शेतमाल विकावा लागतो. शेतमाल मार्केट यार्डातून बाहेर नेण्यासाठी भांडणे करावी लागतात, अशी माहिती परिक्षित चरपे, संदीप सेंबेकर, अतुल दंढारे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी दिली. हा अध्यादेश शेतकरी विरोधी असल्याचा आरोप बाजार समित्यांच्या संचालकांनी केला असून, या अध्यादेशामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होणार असल्याचे मुंबई बाजार समितीचे संचालक तथा कामठी बाजार समितीचे सभापती हुकूमचंद आमधरे यांच्यासह इतर सभावती व संचालकांनी सांगितेल. ही फसवणूक नेमकी कशी होणार, हे मात्र स्पष्ट केले नाही.

सक्षम व्यापारी, एक पर्यायप्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीकडे त्यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्याकडे मूलभूत सुविधा असल्याने या बाजार समित्या सक्षम व्यापारी म्हणून बाजारात उतरू शकतात. अधिकाधिक ग्राहक व नफा मिळविण्यासाठी या बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती द्यावी. शेतमाल तारण कर्जपुरवठा करावा. गोदाम, शीतगृह व तत्सम सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत त्यांचा विश्वास संपादन करावा. ‘राष्ट्रीय कृषी बाजार’ प्रक्रियेत बाजार समित्यांना एक सक्षम व्यापारी म्हणून उतरता येते.

 

टॅग्स :agricultureशेतीMarket Yardमार्केट यार्ड