शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

गिरेंगे..पर फिर लडेंगे : विदर्भवादी परत निवडणुकीसाठी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 01:04 IST

मागील काही निवडणुकांत विदर्भवाद्यांच्या पदरी निराशाच आल्याचे आकडेवारीतून दिसून येते. असे असले तरी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी विदर्भवादी एकत्रित आले आहेत. आता विदर्भवादी मोठ्या पक्षांना घाम फोडतात की प्रचारासाठी कार्यकर्ते जमविताना त्यांनाच घाम फुटतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांचाच जास्त भरणा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मुद्यावर चर्चांना जरी ऊत येत असला तरी निवडणुकांच्या आखाड्यात त्याला फारसे स्थान नसल्याचे दिसून येते. मागील काही निवडणुकांत विदर्भवाद्यांच्या पदरी निराशाच आल्याचे आकडेवारीतून दिसून येते. असे असले तरी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी विदर्भवादी एकत्रित आले आहेत. आता विदर्भवादी मोठ्या पक्षांना घाम फोडतात की प्रचारासाठी कार्यकर्ते जमविताना त्यांनाच घाम फुटतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.लोकसभा निवडणुकांत विदर्भवादी नेत्यांनी एकत्र येत विदर्भ राज्य निर्माण महामंच स्थापन केला. विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ राज्य आघाडी, आम आदमी पार्टी, बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टी, आरपीआय खोब्रागडे, लोकजागर पार्टी, शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष यासारख्या विदर्भवादी राजकीय संघटनांचा प्रामुख्याने समावेश होता. मात्र निकालांत मंचच्या उमेदवारांचे कुठेच अस्तित्वही जाणवले नाही. सातही जागांवरील उमेदवारांची जमानत जप्त झाली. एकेकाळी ज्या भूमीत विदर्भाच्या नावावर उमेदवार विजयी झाले होते, तेथे विदर्भवाद्यांचा प्रभावच राहिला नसल्याचे चित्र निकालांतून समोर आले.आता विधानसभेसाठी परत विदर्भवादी सरसावले आहेत. विदर्भात ६२ पैकी ४० जागांवर लढण्याची त्यांची तयारी आहे. मागील काही काळापासून विदर्भाचे आंदोलन भरकटले असल्याने विदर्भवाद्यांना हवे तसे जनसमर्थन मिळालेले नाही. आता ‘सबकुछ आॅनलाईन’च्या जमान्यात ‘सोशल मीडिया’वरच हे आंदोलन दिसून येते व रस्त्यांवरही ठराविक व मोजकेच चेहरे दिसून येतात. आता विधानसभा निवडणुकांत प्रचारासाठी कार्यकर्ते आणायचे कुठून, असा प्रश्न पदाधिकाऱ्यांसमोर आहे. परंतु ‘गिरेंगे..पर फिर लडेंगे’ ही त्यांची जिद्द कायम आहे. आता जिद्दीतून खरोखर मतं खेचून आणण्यात त्यांना यश मिळते की अपयशाच्या यादीत आणखी एका निवडणुकीचा समावेश होतो, हे लवकरच स्पष्ट होईल.एकाही उमेदवाराने गाठला नाही १ टक्कालोकसभेत विदर्भातील सातही जागांवरील निकालांत विदर्भ राज्य निर्माण महामंचच्या उमेदवारांची जमानत जप्त झाली. हा महामंच तयार करण्यात पुढाकार घेणाऱ्यांपैकी असलेले अ‍ॅड.सुरेश माने यांना नागपुरातून केवळ ०.२९ टक्के मतं मिळाली, तर ज्ञानेश वाकुडकर यांच्या वाट्याला अवघी ०.११ टक्के मतं आली. चंद्रपूर येथील उमेदवार दशरथ मडावी यांना सर्वाधिक ०.२५ टक्के मतं मिळाली.

टॅग्स :Vidarbhaविदर्भPoliticsराजकारणElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा