शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

बंद कोविड केअर सेंटर सुरू होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:11 IST

नागपूर : कोरोनाचा आणीबाणीच्या काळात रुग्ण शहरातील सहा क्वारंटाईन सेंटरला कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतरीत करण्यात आले. परंतु नोव्हेंबरमध्ये रुग्णसंख्या ...

नागपूर : कोरोनाचा आणीबाणीच्या काळात रुग्ण शहरातील सहा क्वारंटाईन सेंटरला कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतरीत करण्यात आले. परंतु नोव्हेंबरमध्ये रुग्णसंख्या कमी होताच पाचपावली व व्हीएनआयटी सेंटर वगळता आमदार निवास, वनामती, सिम्बायोसिस व ओरिएन्ट ग्रॅण्ड हॉटेल बंद करण्यात आले. आता पुन्हा बाधितांची संख्या वाढत असताना हे सेंटर सुरू होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, घरी स्वतंत्र सोय नसल्यास कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना ठेवण्याचा नियम आहे. परंतु पाचपावली सेंटरमध्ये केवळ २४ रुग्ण आहेत. उर्वरीत ३८८५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. यातील बहुसंख्य रुग्णांकडून नियम पाळले जात नसल्याने धोका वाढला आहे.

कोरोनाचे निदान झालेल्या रुग्णांना वैद्यकीयदृष्ट्या लक्षणानुसार वर्गीकृत केले जाते. लक्षणे नसलेले, सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे, मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र लक्षणांनुसार रुग्णांना कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे दाखल केले जाते. परंतु दरम्यानच्या काळात अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांंना जर त्यांच्या घरामध्ये योग्य सुविधा उपलब्ध असेल तर त्यांच्या संमतीनुसार होम आयसोलेशन केले जाते. सध्या याचे प्रमाण वाढले आहे. नागपूर जिल्ह्यात ५६१७ (शुक्रवारपर्यंत) रुग्ण पॉझिटिव्ह असून १७३२ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. उर्वरीत रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

-होम आयसोलेशनमधील कुटुंबात पसरतोय कोरोना

हवेशीर बंद खोली, स्वतंत्र शौचालय, घरात फिरण्यावर बंधन, घराबाहेर पडण्यास प्रतिबंध असतो. सर्जिकल मास्क वापरणे व दर सहा ते आठ तासाने बदलावे लागते. मास्कचे विघटन करण्यासाठी बीच सोल्यूशन (५ टक्के) किंवा सोडियम हयपोक्लोराईट (५ टक्के) वापरून मास्क डिसइनफेक्ट करावे लागते. घरी दिवस-रात्र काळजी घेणारी व्यक्ती असावी लागते. मोबाईलवरील आरोग्य सेतू अ‍ॅपवर अ‍ॅक्टिव्ह असावे लागते. या सर्व सोयी असल्यावरच व तसे रुग्णाने प्रतिज्ञापत्र लिहून दिल्यावरच रुग्णाला होम आयसोलेशन केले जाते. परंतु रुग्ण हे सर्व नियम पाळतात का, हा प्रश्न आहे. मागील आठवड्यात होम आयसोलेशमध्ये असलेल्या रुग्णांच्या घरातूनच बाधित रुग्ण मोठ्या संख्येत आढळून येत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

-कोविड केअर सेंटरमधील स्थिती

आमदार निवास : बंद

वनामती : बंद

ओरिएन्ट ग्रॅण्ड हॉटेल : बंद

सिम्बायोसिस : बंद

व्हीएनआयटी : ८ रुग्ण (विमान प्रवासी)

पाचपावली : २४ रुग्ण