केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय अखेर दिल्लीला जाणार ?

By Admin | Updated: August 15, 2016 01:55 IST2016-08-15T01:55:50+5:302016-08-15T01:55:50+5:30

आयआयएम, एम्ससारख्या संस्था नागपुरात सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे नागपुरातील एक महत्त्वपूर्ण संस्था दिल्लीला हटविण्याचा घाट रचला गेला आहे.

Will the Central Labor Education Board's headquarters go to Delhi? | केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय अखेर दिल्लीला जाणार ?

केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय अखेर दिल्लीला जाणार ?

नागपूरचे मुख्यालय हटविण्याला गुपचूप वेग : कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष
नागपूर : आयआयएम, एम्ससारख्या संस्था नागपुरात सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे नागपुरातील एक महत्त्वपूर्ण संस्था दिल्लीला हटविण्याचा घाट रचला गेला आहे. ५८ वर्षापूर्वी नागपुरातच स्थापन झालेले केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय आता दिल्लीला हटविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. गुपचूपपणे सुरू असलेल्या या हालचालींना मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी मात्र विरोध दर्शविला असून त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. विविध शासकीय संस्था, संघटना, कंपन्या तसेच कारखान्यातील कर्मचाऱ्यांना एका निश्चित कालावधीत प्रशिक्षण देण्यासाठी १९५८ साली केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली व मंडळाचे मुख्यालय नागपुरातच सुरू करण्यात आले होते.

कर्मचाऱ्यांनी सुरूकेले आंदोलन
श्रमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय दिल्लीला स्थानांतरीत करण्याच्या निर्णयाला कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांनी गेल्या आठ दिवसापासून काळ्या फिती लावून शांततेत आंदोलन केले. यानंतर येत्या १६ आॅगस्टपासून सर्व कर्मचारी दररोज मुख्यालयी धरणे आंदोलन करणार आहेत. हे मुख्यालय नागपुरातून हटवू नये, अशी मागणी अखिल भारतीय तृतीय व चतुर्थ श्रेणी केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळ कर्मचारी संघाचे अध्यक्ष राजेश देशमुख व महासचिव राजेश मिश्रा यांनी केली आहे.

 

Web Title: Will the Central Labor Education Board's headquarters go to Delhi?