शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर तुकाराम मुंढे पदावर राहणार की नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 09:07 IST

आज शुक्रवारी स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत मुंढे पदावर राहणार की नाही. यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमनपातील सत्ताधाऱ्याचा आयुक्त मुंढेना विरोध प्रशासकीय संचालकांची भूमिका महत्त्वाची

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाली नसतानाही त्यांनी हे पद बळकावल्याचा मनपातील सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे. मागील काही दिवसापासून यावरून वाद सुरू असताना आज शुक्रवारी स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत मुंढे पदावर राहणार की नाही. यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.मनपातील सत्ताधारी भाजपचा आयुक्त मुंढे यांची ‘सीईओ’ पदावर नियुक्ती करण्याला विरोध आहे. त्यामुळे, संचालक मंडळातील इतर संचालकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीच्या विषय पत्रिकेत ‘सीईओ’ पदी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याही नियुक्तीचा प्रस्ताव आहे. दरम्यान महापौर संदीप जोशी आणि सत्ता पक्षनेता संदीप जाधव यांनी संचालक मंडळाच्या इतर संचालकांना पत्र पाठवून कायद्याच्या अधीन राहून निर्णय घ्यावा, असे आवाहन केले आहे. तिकडे बैठकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त मुंढे यांनीही अधिकाºयांची बैठक घेऊन तयारी केली आहे. महापालिकेतील आयुक्त विरुद्ध सत्ताधारी असा संघर्ष टोकाला गेला आहे.

सत्तापक्षाकडून सलग आयुक्तांच्या कारभारावर आक्षेप घेतले जात आहे. स्मार्ट सिटीचे ‘सीईओ’ नसताना आयुक्तांनी या पदाचे अधिकार वापरले. २० कोटींची देयके चुकवल्याचेही सत्तापक्षाकडून आरोप झाले. दरम्यान, महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त मुंढे यांच्या स्मार्ट सिटीच्या गैरकारभाराची चौकशी व्हावी, अशी याचिका न्यायालयात दाखल केली आहे. परंतु, आयुक्तांनी केलेल्या कामांचे राज्य शासनाकडून कौतूकही केले जात आहे. अशा संघर्षात आता ‘सीईओ’पदाकरिता संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढे