शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वन्य पशू संरक्षण दिन; वनातील संघटित गुन्हेगारी केव्हाही काढू शकते डोके वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 09:34 IST

Wildlife Nagpur News वन्यजीवांना खरा धोका माणसांपासूनच आहे. एके काळी संघटित गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर होती. आता यातील अनेक टोळ्या संपविण्यात यश आले असले तरी संघटित गुन्हेगारी केव्हा डोके वर काढेल, याचा नेम नाही. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात वनातील संघटित गुन्हेगारी आता थंडावली आहे. मात्र ती संपली असे समजून चालणार नाही. ती केव्हाही डोके वर काढू शकते, असा धोक्याचा इशारा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी दिला आहे.वन्य पशू संरक्षण दिनानिमित्त ‘लोकमत’शी ते बोलत होते. ते म्हणाले, वन्यजीवांना खरा धोका माणसांपासूनच आहे. एके काळी संघटित गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर होती. आता यातील अनेक टोळ्या संपविण्यात यश आले असले तरी संघटित गुन्हेगारी केव्हा डोके वर काढेल, याचा नेम नाही. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे.वन्यजीवांना माणसांपासून धोका असल्याचे सांगताना ते म्हणाले, शेतकऱ्यांकडून आणि शिकाऱ्यांकडून जंगलात तसेच श्ोतशिवारात शिकारीसाठी सापळे लावले जातात. यात रानडुकरांसोबत मोठे प्राणीही अडकतात. शेतकऱ्यांचा हेतू वन्यजीव मारण्याचा नसला तरी धोका येथेच होतो.मानव-वन्यजीव संघर्षाचा धोका अधिक आहे. शेतकºयांवर प्राण्यांचे हल्ले वाढले की या घटना घडतात. नागरिकांचा रोष वाढतो. जंगलात तसेच शेतशिवारात विष प्रयोगाच्या घटना घडतात, परिस्थिती स्फोटक बनते. मात्र वनविभागाचे कर्मचारी अशा प्रसंगी योग्य समन्वय राखतात. त्यामुळे बरेचदा यातून योग्य मार्ग निघतो.वन्यजीवांच्या रक्षणासाठी लवकरच शीघ्र बचाव पथक स्थापन केले जाणार आहे. जखमी आणि आजारी प्राण्यांना तातडीने सेवा मिळावी यासाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर अधिक सक्षमतेने उभारणे आणि त्यांची संख्या वाढविण्याचा हेतू आहे. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी गुन्हेगारांचा पाठपुरावा केला जाईल. त्यासाठी अधिक मनुष्यबळ उभारण्याची आणि यंत्रणा सक्षम करण्याची वनविभागाची योजना आहे. सध्या प्रायमरी रिस्पॉन्स टीम कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून नियमित कामे होत आहेत. निरीक्षणासाठी अद्ययावत कुटी उभारण्याचे नियोजन आहे. वन्यजीव मित्र संकल्पना अमलात आली असून त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. शिकारी टोळ्यांचा उपद्रव रोखण्यासाठी वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये एसटीटीएफ कार्यरत आहे. त्यात अधिक वाढ करणे, त्यांना प्रशिक्षीत करणे, प्रशिक्षणासाठी इमारत उभारणे ही कामे केली जाणार आहेत.वन्यजीवांचे रक्षण करणे ही मानवाची जबाबदारी आहे. त्यासाठी सहजीवन स्वीकारणे हाच पर्याय आहे.- नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

 

टॅग्स :wildlifeवन्यजीव