शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

पतीच्या स्मृतीदिनी पत्नीचे अवयवदान; तीन मुलींनी घेतला पुढाकार

By सुमेध वाघमार | Updated: June 10, 2023 18:58 IST

Nagpur News आईचे अचानक ब्रेन हॅमरेज होऊन ती ब्रेन डेड झाल्याचे निदान झाल्यानंतर, तीन मुलींनी आईचे अवयवदान केले. योग असा की, ते त्यांच्या वडिलांच्या स्मृतीदिनी झाले.

सुमेध वाघमारे नागपूर : १० वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाल्याने आईने संसार सांभाळला. तिन्ही मुलींना शिक्षण देत मोठे केले. संसाराची गाडी रुळावर येत असताना अचानक ‘ब्रेन हॅमरेज’ झाले. उपचार सुरू असताना डॉक्टरांनी ‘ब्रेन डेड’ झाल्याची माहिती नातेवाईकांना दिली. आई-वडिलांचे छत्र हरविलेल्या तिन्ही बहिणींनी त्या दु:खातही अवयवदान करण्यासाठी पुढाकार घेतला. या मानवतावादी निर्णयाने तिघांना नवे जीवन मिळाले. विशेष म्हणजे, वडिलांच्या मृत्यूच्या दिवशी आईचे अवयवदान झाले.

  नागपूर येथील मस्जीद रोड तुलानी चौक डिफे न्स येथील रहिवासी ललिता टवले त्या अवयवदात्याचे नाव. त्यांचे पती ऑर्डनन्स फॅक्टरी, अंबाझरी येथे  कामाला होते. त्यांचे १० जून रोजी अचानक निधन झाले. त्यांच्या जागी ललिता यांना नोकरी मिळाली. ऑर्डनन्स फॅक्टरीच्या क्वार्टरमध्ये राहून आपल्या तीन मुलींचा सांभाळ करीत विस्कळीत झालेला संसाराचा गाडा मोठ्या हिंमतीने रुळावर आणला. २०१८ मध्ये ऑर्डनन्स फॅक्टरीकडून उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना बक्षीसही मिळाले.

८ जून रोजी ललिता कामावर असताना अचानक प्रकृती खालवली. एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना डॉक्टरांच्या एका पथकाने तपासून मेंदू मृत म्हणजे ‘ब्रेन डेड’ झाल्याची माहिती कुटुंबियांना दिली. मुली मोनिका, पूजा, शीतल आणि नातेवाईकांना धक्का बसला. डॉक्टरानी त्यांना अवयदान करून आईला अवयवरुपी जिवंत ठेवण्याचा सल्ला दिला. तिन्ही मुलींनी त्या दु:खातही पुढाकर घेतला. आज १० जून रोजी त्यांनी आईचे अवयवदान केले. याच दिवशी वडिलांचे निधन झाल्याने हे अवयवदान त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरले. ‘झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर’ने (झेडटीसीस) त्यांच्या दोन्ही किडनी व लिव्हरचे नियमानुसार तीन रुग्णांना दान केले. सायंकाळी अंबाझरी येथील आयुध निमार्णी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलींच्या या पुढाकाराचे समाजात कौतुक होत आहे. या वर्षातील हे १३ वे तर, आतापर्यंतचे १०८ वे अवयदान होते.

टॅग्स :Organ donationअवयव दानHealthआरोग्य