शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईहून रिवाकडे निघालेल्या कामगाराच्या पत्नीची प्रवासातच प्रसुती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 23:24 IST

मुंबईहून मध्य प्रदेशातील रिवाकडे निघालेल्या एका कामगाराच्या पत्नीला वाटेतच प्रसव कळा आल्या. तिची अवघडलेली अवस्था बघून सामाजिक कार्यकर्ते मदतीला धावले. गुमथळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचवून तिची सुखरूप प्रसुती झाली, तेव्हा कुठे सर्वांचा जीव भांड्यात पडला.

ठळक मुद्देभररस्त्यात प्रसुती कळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबईहून मध्य प्रदेशातील रिवाकडे निघालेल्या एका कामगाराच्या पत्नीला वाटेतच प्रसव कळा आल्या. तिची अवघडलेली अवस्था बघून सामाजिक कार्यकर्ते मदतीला धावले. गुमथळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचवून तिची सुखरूप प्रसुती झाली, तेव्हा कुठे सर्वांचा जीव भांड्यात पडला.सुधा कौल असे या महिलेचे नाव असून ती १९ वर्षाची आहे. परप्रांतात निघालेल्या स्थलांतरित कामगारांच्या मदतीसाठी कापसी बायपास मार्गावर स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी एक मदत केंद्र उभारले आहे. बुधवारी दुपारी १२.१५ वाजताच्या दरम्यान ही महिला आपल्या पतीसह याठिकाणी आली होती. मदत केंद्रावर नाश्ता केल्यावर गर्दी असल्याने व बरे वाटत नसल्याने ती विश्रांतीसाठी जवळच्या एका झाडाखाली गेली. मात्र तिथेच तिला प्रसव कळा सुरू झाल्या. तिची ही अवस्था बघून सोबतच्या कामगारांनी व तिच्या पतीने मदत केंद्रावरील सामाजिक कार्यकर्त्यांना सहकार्याची विनंती केली. तिची ही अवघडलेली परिस्थिती लक्षात घेऊन सुनील सोमय्या व स्थानिक जि.प सदस्या अवंतिका लेकुरवाळे यांनी आपल्या कारमध्ये या कामगार महिलेला व तिच्या पतीला बसवून गुमथळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. दुपारी १ वाजता तिथे पोहोचताच अगदी दहा मिनिटात तिची नैसर्गिक प्रसुती झाली. डॉक्टर वैथारिया यांनी तिच्यावर उपचार केले. सध्या बाळ आणि मातेची प्रकृती ठणठणीत असून सामाजिक कार्यकर्ते मदतीत गुंतले आहेत. सध्या महिलेला नागपूरच्या डागा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. दोघांची प्रकृती उत्तम आहे. गुमथळा येथील सरपंच अमोल महल्ले तसेच या मदत केंद्रावरील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या कामगार कुटुंबाच्या मदतीसाठी तत्परतेने धाव घेतलीमध्य प्रदेशातील रिवा येथील काही कामगार मुंबईत कामाला आहेत. सुधा ही महिलासुद्धा आपल्या पतीसह मुंबईत मजुरीच्या कामाला गेली होती. मुंबईतून सुमारे दहा किलोमीटर पायी चालल्यावर त्यांना एक वाहन मिळाले. त्यातून ते नाशिकपर्यंत आले. तिथून पुन्हा काही अंतर पायी चालल्यावर एका वाहनातून त्यांनी मजल-दरमजल करीत तर कधी पायी अंतर चालत नागपूर गाठले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूरMigrationस्थलांतरण