शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

हेर निशांत अग्रवालच्या पत्नीचाही मोबाईल, लॅपटॉप जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 21:42 IST

आयएसआयच्या इशाऱ्यावर ब्राम्होसची हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवाल याची पत्नी क्षितिजा हिचाही मोबाईल तसेच लॅपटॉप एटीएसने जप्त केला आहे. दरम्यान, निशांतला एटीएसने लखनौला नेल्यानंतर क्षितिजाही बुधवारी तिच्या माहेरी भोपाळला निघून गेली आहे. निशांत ज्या घरात राहत होता, त्या उज्ज्वलनगरातील परिसरात आता उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

ठळक मुद्देक्षितिजा गेली भोपाळला : शेजाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आयएसआयच्या इशाऱ्यावर ब्राम्होसची हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवाल याची पत्नी क्षितिजा हिचाही मोबाईल तसेच लॅपटॉप एटीएसने जप्त केला आहे. दरम्यान, निशांतला एटीएसने लखनौला नेल्यानंतर क्षितिजाही बुधवारी तिच्या माहेरी भोपाळला निघून गेली आहे. निशांत ज्या घरात राहत होता, त्या उज्ज्वलनगरातील परिसरात आता उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.शेजाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार,आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेला निशांत फारसा कुणाशी मिळत मिसळत नव्हता. तो फटकूनच वागायचा. पकडला जाण्याच्या दोन दिवसांपूर्वी त्याची दुचाकी बंद पडली तेव्हा तो बाजूच्या एका गॅरेजवर बसून होता. शत्रू राष्ट्रातील हेरांना आपली माहिती उघड करून देणाऱ्या निशांतने गॅरेजवाला अथवा आजूबाजूच्यांना मात्र आपल्याबद्दल काही सांगण्याचे कटाक्षाने टाळले होते. त्याला पकडल्यानंतर आज सहज चर्चा करणाºया शेजाºयांकडून ही माहिती उपलब्ध झाली. दरम्यान, आपल्या घरात आयएसआयचा एजंट राहत होता, ही बाब घरमालक मनोहर काळे यांना मानसिक धक्का देणारी ठरली आहे. ते यासंबंधाने वारंवार संपर्क करूनही काही बोलायला तयार नाही. दरम्यान, सोमवारी सकाळी निशांतला एटीएसने अटक केली. त्यानंतर त्याच्या पत्नीचीही तपास अधिकाऱ्यांकडून चौकशी झाली. तिच्या मोबाईलमध्ये आणि फेसबुक प्रोफाईलमध्येही निशांतच्या कथित मैत्रिणी (हनी ट्रॅप लावणाऱ्या)ची प्रोफाईल मिळाल्याने तिचा या प्रकरणात काही संबंध आहे का, याचीही तपास अधिकाऱ्यांनी खात्री करून घेतली. तिचा मोबाईल आणि लॅपटॉपही त्यांनी ताब्यात घेतल्याचे समजते. तिला विशिष्ट सूचना देऊन तपास अधिकाऱ्यांनी बाहेर ठेवले. दरम्यान, लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यानेच संसाराची निशांतने अशा प्रकारे वाट लावल्याने क्षितिजाला कमालीचा मानसिक धक्का बसला आहे. शेजारी राहणाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे क्षितिजा दोन दिवस आपल्या घरमालकांसोबतही बोलली नाही. बुधवारी ती आपल्या माहेरी भोपाळला निघून गेली.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBrahmos Missileब्राह्मोस