शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा पतीवर, प्रेयसीचा प्रियकरावर बलात्काराचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 01:18 IST

चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करणाऱ्या पती(वय ३५)वर त्याच्या पत्नीने (वय ३४) बलात्काराचा आरोप लावला. तर, दोन वर्षांपासून सोबत ठेवून ठिकठिकाणी नेऊन शरीरसंबंध जोडणाऱ्या एका प्रियकराविरुद्ध त्याच्या प्रेयसीने बलात्काराची तक्रार दिली. मानकापूर ठाण्यात या दोन्ही प्रकरणात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देचर्चेला उधाण : मानकापुरात दोन गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करणाऱ्या पती(वय ३५)वर त्याच्या पत्नीने (वय ३४) बलात्काराचा आरोप लावला. तर, दोन वर्षांपासून सोबत ठेवून ठिकठिकाणी नेऊन शरीरसंबंध जोडणाऱ्या एका प्रियकराविरुद्ध त्याच्या प्रेयसीने बलात्काराची तक्रार दिली. मानकापूर ठाण्यात या दोन्ही प्रकरणात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.पत्नीच्या तक्रारीनुसार, तिचा हा दुसरा पती आहे. तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला नेहमी मारहाण करायचा आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत शरीरसंबंध जोडायचा. त्यामुळे त्यांच्यातील वाद वाढत गेला अन् शुक्रवारी, १७ मे रोजी तिने पतीविरुद्ध मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून छळ करणे तसेच बलात्कार करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, याच महिलेविरुद्ध आता आरोपी बनलेल्या पतीने फसवणूक तसेच ५० लाख रुपयांच्या खंडणी वसुलीची तक्रार नोंदविल्याने आठ दिवसांपूर्वी तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी याप्रकरणी सदर महिलेविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे. प्रकरण संवेदनशील असल्याने पोलीस सावधगिरीने तपास करीत आहेत.दुसरी तक्रार १७ वर्षीय प्रेयसीने केली. तिचे आकाश गजानन टाले (वय २२, रा. मानवसेवानगर) याच्यासोबत सप्टेंबर २०१८ पासून प्रेमसंबंध होते. आकाश झोमॅटोत फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. सप्टेंबर २०१८ ते मार्च २०१९ पर्यंत त्याने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याशी शरीरसंबंध जोडले. आता मात्र त्याने तिच्यासोबत संबंध तोडले. लग्नालाही नकार दिला. त्यामुळे प्रेयसीने आकाशविरुद्ध बलात्काराचा आरोप लावला. तिने दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आकाश टालेला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार