शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या विरहात पत्नीनेही सोडला प्राण; बोरगावच्या गोकुल सोसायटीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2022 14:55 IST

पतीच्या निधनाने खचून गेलेल्या पत्नीनेही दिवाळी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी जगाचा निरोप घेतला.

नागपूर : लग्नाला अवघे सहा महिनेच झालेले असताना दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी यवतमाळ येथे पतीने आत्महत्या केली. पतीच्या निधनाने खचून गेलेल्या पत्नीनेही दिवाळी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. ही घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव येथील गोकुल सोसायटी, लियो गॅलेक्सी फ्लॅट नं. २०४ मध्ये गुरुवार, २७ ऑक्टोबरला दुपारी १२:३० वाजता घडली.

मीनू विशाल देशमुख (३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मीनूचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. मीनूचे पती विशाल देशमुख हे यवतमाळला ठेकेदार होते. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी विशाल देशमुख यांनी यवतमाळ येथे आत्महत्या केली होती. तेंव्हापासून मीनू तणावात होत्या. त्या खासगी काम करीत होत्या. पतीच्या आत्महत्येनंतर त्या सतत विचारमग्न राहत होत्या. त्यांना या दु:खातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांनी दिवाळीला आपल्या घरी बोलावले.

नातेवाइकांकडे दिवाळी केल्यानंतर गुरुवारी सकाळी मीनू आपल्या बोरगाव येथील फ्लॅटवर परतल्या. परंतु घरी येताच त्यांनी सुसाईड नोट लिहिली. यात आपल्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नसल्याचा उल्लेख करून सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळफास घेत आपला प्राण सोडला. या प्रकरणी स्वप्निल रमेश गिरी (३२, समता ले आउट, अंबाझरी) यांनी दिलेल्या सूचनेवरून गिट्टीखदानचे उपनिरीक्षक राजकुमार उपाध्याय यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूhusband and wifeपती- जोडीदारnagpurनागपूर