शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
4
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
5
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची ही गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
6
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
7
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
8
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
9
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
10
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
11
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
12
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
13
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
14
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
15
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
16
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
17
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
18
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
19
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
20
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?

शेतकरी महिलेला अर्धवस्त्र करून मारहाण करणाऱ्या ‘त्या’ सावकारासह पत्नीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 10:50 IST

शेतकरी महिलेला मारहाण करणाऱ्या सावकार पती-पत्नी विरोधात तक्रार प्राप्त होताच भिवापूर पोलिसांनी बुधवारी गुन्हा नोंदवीत अटक केली.

ठळक मुद्देशेतकरी महिलेला मारहाणप्रकरणी गुन्हा दाखलवाकेश्वरचे अवैध सावकारी प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अगतिक शेतकऱ्याला प्रारंभी व्याजाने पैसे देत शेतीचे विक्रीपत्र करणाऱ्या आणि  ताबा मिळविण्यासाठी खटाटोप करत शेतकरी महिलेला मारहाण करणाऱ्या सावकार पती-पत्नी विरोधात तक्रार प्राप्त होताच भिवापूर पोलिसांनी बुधवारी गुन्हा नोंदवीत अटक केली. अवैध सावकारीतून विनयभंगासारख्या निर्लज्जतेचा कळस गाठणारे हे प्रकरण ‘लोकमत’ने उजेडात आणले.अभयचंद्र ज्ञानेश्वर पाटील व प्राजक्ता अभयचंद्र पाटील रा. मोहपा रोड, रेवतकर कॉलनी उमरेड असे गुन्हा दाखल केलेल्या सावकार पतीपत्नीचे नाव आहे, तर शेषराव हेमराज चौधरी रा. मालेवाडा असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. शेतकरी महिलेला मारहाणीची माहिती मिळताच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना दोषीवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. ठाणेदार महेश भोरटेकर यांनी लागलीच पीडित शेतकरी महिला व सावकार पतीपत्नीला पोलीस स्टेशनला बोलावून याप्रकरणी माहिती घेतली. फिर्यादीकडून तक्रार नोंदवून घेत आरोपी अभयचंद्र व प्राजक्ता यांच्याविरुद्ध भादंविच्या ३५४ अ, ब, ४२०, ३२३, ५०४, ५०६, ३४ व महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ कलम ३९,४१ (सी), ४५ अन्वये गुन्हा नोंदवीत अटक केली. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, सहायक निरीक्षक शरद भस्मे करीत आहेत.काय होती घटना?दामिनी (काल्पनिक नाव) असे पीडित शेतकरी महिलेचे नाव आहे. व्याजाचे पैसे, शेतीचे विक्रीपत्र आणि ताबा मिळविण्यासाठी अवैध सावकाराचा खटाटोप यातूनच ही निर्लज्जपणाचा कळस गाठणारी घटना घडली. दामिनीने दिलेल्या माहितीनुसार २० जून रोजी अवैध सावकाराने पत्नीसह पीडित महिलेचे शेत गाठत, ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. याप्रकाराला दामिनी व तिच्या पतीने विरोध केला. दरम्यान अवैध सावकार व त्याच्या पत्नीने हातात लाठीकाठ्या धरून दामिनीला मारहाण करत शेतात हक्क गाजविण्यास सुरुवात केली. उदरनिवाहार्चे साधन हिसकले जात असल्याने दामिनीने शेतात फिरत असलेला अवैध सावकाराचा ट्रॅक्टर रोखण्यासाठी प्रयत्न केला. दरम्यान सावकाराच्या पत्नीने दामिनीला साडी खेचून अक्षरश: बेअब्रू केले. हा प्रकार सुरू असताना अवैध सावकारासह ट्रॅक्टरचालक व अन्य ५-६ पुरुष शेतात उपस्थित होते. मात्र दामिनीच्या मदतीसाठी कुणीही पुढे आले नाही. हा सर्वप्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे.असे आहे प्रकरणदामिनीच्या पतीच्या नावे तालुक्यातील वाकेश्वर येथे एक हेक्टर शेती आहे. नुकसानीमुळे कर्जबाजारी झालेल्या दामिनीच्या पतीने तीन वर्षांपूर्वी उमरेड येथील अवैध सावकाराकडून व्याजाने रक्कम घेतली होती. व्याजाची वाढती रक्कम देण्यासाठी त्यांनी अनेकदा सावकाराचे उंबरठे झिजविले. मात्र सावकाराने त्यास नकार दिला. अद्यापही पीडित शेतकरीच शेताची वाहीजुपी करीत आहे. अशात गत २० जून रोजी सावकार व त्याच्या पत्नीने दामिनीच्या शेतात दाखल होत, ताबा मिळविण्यासाठी उपद्व्याप केला. यावेळी सावकाराच्या पत्नीच्या नावे आपल्या शेताचे विक्रीपत्र पाहून दामिनीला धक्का बसला. याप्रकरणी १५ जून रोजी दामिनीने पोलिसात तक्रारही नोंदविली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग