शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
5
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
6
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
7
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
9
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
10
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
11
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
12
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
13
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
14
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
15
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
16
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
17
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
18
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
19
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
20
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

केळीबाग रस्ता रुंदीकरण :व्यापाऱ्यांना हवा नगदी मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:23 IST

सर्वोच्च न्यायालयात केळीबाग रस्ता रुंदीकरणाची लढाई जिंकण्यात यश मिळाल्यानंतर स्वत: च्या मालकीच्या इमारती पाडून महापालिकेने रस्ता रुंदीकरणाला सुरूवात केली. परंतु रस्ता रुंदीकरण महापालिकेसाठी महागडे ठरत आहे. यात बाधित होणाऱ्या व्यापाऱ्यांना ट्रान्सफरेबल डेव्हलपेंट राईट (टीडीआर) व फ्लोर स्पेस इंडेक्स ( एफएसआय ) स्वरुपात मोबदला घेण्यास व्यापाऱ्यानी नकार दिला आहे.

ठळक मुद्देटीडीआर, एफएसआयला नकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयात केळीबाग रस्ता रुंदीकरणाची लढाई जिंकण्यात यश मिळाल्यानंतर स्वत: च्या मालकीच्या इमारती पाडून महापालिकेने रस्ता रुंदीकरणाला सुरूवात केली. परंतु रस्ता रुंदीकरण महापालिकेसाठी महागडे ठरत आहे. यात बाधित होणाऱ्या व्यापाऱ्यांना ट्रान्सफरेबल डेव्हलपेंट राईट (टीडीआर) व फ्लोर स्पेस इंडेक्स ( एफएसआय ) स्वरुपात मोबदला घेण्यास व्यापाऱ्यानी नकार दिला आहे. बाधितांना नगद मोबदला हवा आहे. या भागातील जागेचे भाव विचारात घेता यासाठी महापालिकेला १०० कोटीहून अधिक रक्कम खर्च करावी लागणार आहे.मध्य नागपूर व दक्षिण नागपूरला जोडणारा केळीबाग मार्ग २४ मीटर रुंद क रण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. रस्ता रुंदीकरणामुळे महाल बाजारातील व्यापारी सर्वाधिक बाधित होणार आहेत. २९ मार्च २००८ रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभागृहात केळीबाग रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव पारित करण्यात आला होता. यात सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील गांधीपुतळा ते बडकस चौक, कोतवाली पोलीस स्टेशन ते सीपी अ‍ॅन्ड बेरार कॉलेज दरम्यानच्या मार्गाचा समावेश आहे. यासाठी महापालिकेला मार्गाच्या दोन्ही बाजुची १४५५.८२ चौ. मीटर जागेची गरज भासणार आहे. १.५ किलोमीटर लांबीचा हा मार्ग २४ मीटरचा केला जाणार आहे. सध्या हा मार्गा १० ते १५ मीटर रुंदीचा आहे. या मार्गात महापालिकेच्या सहा मालमत्ता, राज्य सरकारची जमीन व मातृसेवा संघ रुग्णालय बाधित होत आहे.टीडीआर, एफएसआयला नकारमहापालिकेतर्फे १५७ दुकानदार व ५० निवासी मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. बाधित व्यापारी व नागरिकांची महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी  बैठक घेतली. परंतु बहुसंख्य व्यापाऱ्यांना नगदी मोबदला हवा आहे. टीडीआर व एफएसआय घेण्याला त्यांचा नकार आहे.दुप्पट रेडिरेकनर द्यावा लागेलरस्यासाठी जागा अधिग्रहीत करताना बाधितांना भूमी अधिग्रहण कायद्यानुसार रेडिरेकनरच्या दराच्या तुलनेत दुप्पट मोबदला द्यावा लागणार आहे. यावर १०० कोटीहून अधिक खर्च करावा लागेल. अशी माहिती महापालिकेच्या अधिकाºयांनी दिली. ही रक्कम कशी उभी करणार यावर बोलायला कुणीही तयार काही. नोटीसच्या उत्तरात गांधीबाग झोन कार्यालयाकडे ७० पत्रे आलेली आहेत. यात सर्वांनी नगदी रक्कम मिळावी. अशी मागणी केली आहे.सिमेंटरोडच्या तिसऱ्या टप्प्पात कामसिमेंट रोडच्या तिसऱ्या टप्प्यात केळीबाग मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. परंतु नगदी मोबदल्याची मागणी केल्याने रुंदीकरणाचे काम रखडण्याची शक्यता आहे. आमचा विकासाला विरोध नाही. परंतु जागा घेणार असेल तर मोबदला मिळालाच पाहिजे. टीडीआरला काही किंमत नसल्याची व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाNagpur Muncipal Planning Development Authorityनागपूर महानगर नियोजन विकास प्राधिकरण