शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

म्हणूनच निर्ढावतात क्रूरकर्मे आणि घोषणांच्या पावसात अश्रू जातात वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 11:54 AM

Hathras, Gang rape, Nagpur News हाथरस प्रकरणाने देश ढवळून निघाला आहे. देशात यापूर्वी दिल्लीच्या निर्भया आणि हैदराबादच्या प्रकरणानेही अशीच संतापाची लाट निर्माण केली होती.

ठळक मुद्देशिक्षा तर दूरच, सुनावणीलाही सुरुवात नाही

नरेश डोंगरे!लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हाथरस बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणामुळे पुन्हा एकदा देशभर संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवू, दोषींना कठोरात कठोर आणि लवकरात लवकर शिक्षा केली जाईल, अशी घोषणा होईल. प्रत्यक्षात पीडित परिवाराला तातडीने न्याय मिळणार नाही. होय, ही सर्वसामान्यांची भावनाच नाही तर यापूर्वीच्या अशाच घटनांतून आलेला त्यांचा अनुभव आहे.हाथरस प्रकरणाने देश ढवळून निघाला आहे. देशात यापूर्वी दिल्लीच्या निर्भया आणि हैदराबादच्या प्रकरणानेही अशीच संतापाची लाट निर्माण केली होती. नागपुरात मोनिका किरणापुरे, कांचन मेश्राम, सानिका थुगावकर तर हिंगणघाट (वर्धा) मध्ये अंकिता जळीतकांडाने देशभर संतापाची लाट उसळवली होती. प्रत्येक वेळी उफाळून आलेला जनक्षोभ शांत करण्यासाठी ‘या प्रकरणाचा’ तातडीने निकाल लावू, आरोपींना फासावर टांगू, अशी भाषा वापरण्यात येते. प्रत्यक्षात असे काहीही होत नाही. राजकीय घोषणांच्या पुरात पीडित परिवाराचे अश्रु वाहून जातात. कोर्टकचेऱ्यामध्ये तारखांच्या बांधावर न्याय अडकतो. महिनोन्महिने या केसच बोर्डावर येत नाहीत. एखाद्या प्रकरणात शिक्षा सुनावली तरी त्याची वर्षानुवर्षे अंमलबजावणी होत नाही. त्यामुळेच गुंड निर्ढावतात. देशभर खळबळ उडवून देणाºया नागपूर विदर्भातील खालील तीन प्रकरणातून त्याची प्रचिती यावी.१ जुलै २०१८ च्या रात्री ७.४५ च्या सुमारास आरोपी हेमनानीने सानिकाला तिच्या मामाच्या कार्यालयात गाठले. ‘तू माझ्याशी संबंध का तोडले’ असा प्रश्न करीत त्याने तिच्या छातीवर, पोटावर आणि पाठीवर चाकूचे सपासप घाव घालून तिला संपविले होते. आता या प्रकरणाला अडीच वर्षे झाली. अद्याप या प्रकरणात आरोपीला शिक्षा झालेली नाही.१८ डिसेंबर २००५ ला लोणारा (कळमेश्वर)च्या कांचन मेश्रामला राकेश मनोहर कांबळे आणि अमरसिंग किसनसिंग ठाकूर या नराधम गुंडांनी तिच्या नातेवाईकांसमोरून उचलून नेले. उभा गाव जमा झाला असताना त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिची शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या केली होती. न्यायालयाने जून २०१३ मध्ये त्यांना फाशीची सुनावली. मात्र अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.३० दिवसांत न्याय !हिंगणघाटच्या अंकिता नामक प्राध्यापिकेला ३ फेब्रुवारी २०२० ला नराधम विकेश नगराळे याने जिवंत पेटवले होते. या जळीतकांडाने देशभर संतापाची लाट उसळली होती. संतप्त लोकभावना लक्षात घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आंध्रप्रदेशच्या धर्तीवर कायद्याचा अभ्यास करून या जळीत कांडातील क्रूरकर्म्याचा ३० दिवसांच्या आत कायदेशिर निकाल लावण्याचे प्रयत्न केले जातील. जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) हा खटला चालवून मृत अंकिता आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय दिला जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र असे काहीही झाले नाही. हे प्रकरण हिंगणघाटच्या सत्र न्यायालयात पडून आहे. दोषारोपपत्र दाखल होऊन १८० दिवस झाले परंतू त्याची अद्याप सुनावणीही सुरू झालेली नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी