लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नियंत्रणासंदर्भात विविध कायदेशीर तरतुदी व आवश्यक आदेश उपलब्ध असतानाही शहरामध्ये मोकाट कुत्री हैदोस घालत असल्यामुळे जबाबदार अधिकान्यांवर कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने बुधवारी महानगरपालिका व पोलिस आयुक्तांना केली आणि यावर येत्या ९ सप्टेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.
मोकाट कुत्र्यांचा हैदोस थांबविण्यासाठी व्यावसायिक विजय तालेवार व मनोज शाक्य यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व अजित कडेठाणकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, मनपाने मोकाट कुत्री नियंत्रित करण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांची नावे सादर केली. न्यायालयाने ती नावे रेकॉर्डवर घेतली व पोलिस आयुक्तांनाही जबाबदार अधिकान्यांची नावे द्यावी, असे सांगून हे निर्देश दिले. मोकाट कुत्री नियंत्रित करण्याकरिता विविध कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. यासंदर्भात आम्हीदेखील वेळोवेळी आवश्यक आदेश दिले आहेत. असे असताना गेल्या अनेक वर्षापासून परिस्थिती जशीच्या तशी आहे. नागरिकांना आताही मोकाट कुत्र्यांचा हैदोस सहन करावा लागत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची वेळ आली आहे, असे न्यायालय यावेळी म्हणाले. याचिकाकर्त्यातर्फे वरिष्ठ अॅड. फिरदौस मिर्झा तर, मनपातर्फे अॅड. सुधीर पुराणिक यांनी कामकाज पाहिले.
हे आहेत मनपाचे जबाबदार अधिकारी
- मुख्यालय - अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, उपायुक्त राजेश भगत, पशुचिकित्सा अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले.
- लक्ष्मीनगर झोन - सहायक आयुक्त
- सतीश चौधरी व झोनल अधिकारी ऋषिकेश इंगळे.
- धरमपेठ झोन - सहायक आयुक्त स्नेहलता कुंभार-ढेरे व झोनल अधिकारी दीनदयाल टेंभरे.
- हनुमाननगर झोन - सहायक आयुक्त
- नरेंद्र बावनकर व झोनल अधिकारी दिनेश कलोडे.
- धंतोली झोन सहायक आयुक्त प्रमोद वानखेडे व झोनल अधिकारी राजेश गायधनी.
- नेहरूनगर झोन - सहायक आयुक्त विकास रायबोले व झोनल अधिकारी विठोबा रामटेके,
- गांधीबाग झोन - सहायक आयुक्त गणेश राठोड व झोनल अधिकारी सुरेश खुरे.
- सतरंजीपुरा झोन - सहायक आयुक्त धनंजय जाधव व झोनल अधिकारी वामन कैलकर,
- लकडगंज झोन - सहायक आयुक्त विजय थुल व झोनल अधिकारी मंगेश राऊत
- आशीनगर झोन - सहायक आयुक्त हरीश राऊत व झोनल अधिकारी सुनील तांबे.
- मंगळवारी झोन - सहायक आयुक्त अशोक गराटे व झोनल अधिकारी प्रमोद आत्राम