शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

घरापुढे टिन ठोकण्याचे उपद्व्याप कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 22:06 IST

कोविड-१९ चा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह येताच सुरुवातीला वस्त्यात टिन लावून सील केल्या जात होत्या. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता परिसर सील केला जात नाही. परंतु पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घराला टिन लावण्याचा उपद्व्याप अद्याप सुरूच आहे. यावर लाखो रुपयांचा झालेला खर्च पाण्यात जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ चा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह येताच सुरुवातीला वस्त्यात टिन लावून सील केल्या जात होत्या. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता परिसर सील केला जात नाही. परंतु पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घराला टिन लावण्याचा उपद्व्याप अद्याप सुरूच आहे. यावर लाखो रुपयांचा झालेला खर्च पाण्यात जात आहे.कोविड-१९ नियंत्रण व उपाययोजनांसंदर्भात महापालिका आयुक्तांनी झोनच्या सहायक आयुक्तांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येताच संबंधित व्यक्तीच्या घरापुढे वा अपार्टमेंट परिसरात टिन लावण्यासाठी झोनचे अधिकारी व कंत्राटदार तत्पर असतात. टिन लावून संबंधित घराचा रस्ता बंद केला जात नाही. मग टिन कशासाठी लावल्या जातात, हा चौकशीचाच भाग आहे. टिन लावण्याला पॉझिटिव्ह व्यक्तीच्या कुटुंबीयांचा विरोध असतो. परंतु प्रशासनाच्या निर्देशानुसार कारवाई करावी लागते, असे संबंधित अधिकारी व कंत्राटदाराकडून सांगितले जाते. यासंदर्भात झोनच्या सहायक आयुक्तांशी चर्चा केली असता, काहींनी आमच्या झोनमध्ये फक्त बॅनर लावले जात असल्याचे सांगितले. मात्र अजूनही घरापुढे टिन लावण्याचा प्रकार सुरू आहे.३० लाखाहून अधिक खर्चएका घराला टिन लावण्यासाठी १५ ते २० हजार रुपये खर्च केले जातात. नागपूर शहरात मागील काही दिवसात दररोज ८०० ते १००० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. याचा विचार करता टिन लावल्यावर दररोज लाखोचा खर्च होत आहे. यावर ३० लाखाहून अधिक खर्च झाल्याची माहिती आहे.काही झोनमध्ये फलक व स्टिकरचा वापरटिन लावण्याला नागरिकांचा होणारा विरोध लक्षात घेता, काही झोनच्या सहायक आयुक्तांनी पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरापुढे टिन न लावता बॅनर व पोस्टर लावण्याला सुरुवात केली आहे. मनपाच्या सर्व झोनमध्ये अशाप्रकारे बॅनर व पोस्टरचा वापर का केला जात नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर