शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पीक कर्जासाठी मूल्यांकनाची गरज कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 22:47 IST

राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना २०१७ अंतर्गत जाहीर केलेल्या पीककर्जमाफीबाबत शेतकऱ्यांमध्ये अजूनही संभ्रम कायम आहे. कर्जमाफी लाभार्थ्यांच्या याद्या बँक शाखांमध्ये लावण्यात आल्या नसून, ज्यांची कर्ज माफ करण्यात आली, त्या शेतकऱ्यांना ‘नो ड्यू सर्टिफिकेट’साठी बँकेचे उंबरठे झिजवावे लागत आहे.

ठळक मुद्देजाचक अटीने शेतकऱ्यांना मनस्ताप : ‘नो ड्यू सर्टिफिकेट’साठी बँकांचे उंबरठे झिजविणे सुरूच

अभय लांजेवार

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना २०१७ अंतर्गत जाहीर केलेल्या पीककर्जमाफीबाबत शेतकऱ्यांमध्ये अजूनही संभ्रम कायम आहे. कर्जमाफी लाभार्थ्यांच्या याद्या बँक शाखांमध्ये लावण्यात आल्या नसून, ज्यांची कर्ज माफ करण्यात आली, त्या शेतकऱ्यांना ‘नो ड्यू सर्टिफिकेट’साठी बँकेचे उंबरठे झिजवावे लागत आहे. त्यातच नवीन पीककर्ज घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून त्यांच्या मालमत्तेचे ‘मूल्यांकन’ करणे व सातबारावर पिकांच्या वर्गवारीनुसार पीककर्जाची नोंद करणे आवश्यक असल्याचे फर्मान बँकांनी सोडले. पीककर्ज सातबारावर नोंद करण्यात आलेल्या पिकांच्या वर्गवारीनुसार देण्यात येते. या अडवणुकीच्या प्रकरामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच मूल्यांकनाची गरज काय, असा प्रश्नही अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित केला.पीककर्जमाफीच्या घोषणेला वर्षभरापेक्षा अधिक काळ पूर्ण झाला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्व सोपस्कार पूर्ण करूनही बँकेचे हेलपाटे मारणे सुरूच आहे. त्यातच शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली असून, अद्यापही त्यांच्या हाती पीककर्जाची दमडीही पडली नाही. बँकांनी लाभार्थी यादी जाहीर न केल्याने शेतकरी त्यांचे नाव यादीत समाविष्ट आहे की नाही, याबाबत आजही काकुळतीने विचारणा करीत आहेत. मात्र, बँक कर्मचारी असभ्य वर्तन करीत असल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी केल्या.काहींनी बँकांकडे नवीन पीककर्जासाठी अर्ज सादर केले. त्यांना बँकांकडून मूल्यांकन प्रमाणपत्राची मागणी केली जात आहे. त्यामुळे सदर प्रमाणपत्र घेण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयात धाव घ्यावी लागत आहे. यासाठी १०० रुपयांपेक्षा अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. शिवाय, या प्रमाणपत्रासाठी तीन दिवसांची घालण्यात आली आहे. हे सर्व सोपस्कार करताना ऐन हंगामात शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे.अर्जांचा गठ्ठामूल्यांकन प्रमाणपत्रासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाकडे रोज शेकडो अर्ज प्राप्त होत असल्याने या कार्यालयात सध्या या अर्जांचा भलामोठा गठ्ठा तयार झाल्याचे दिसून येते. रजिस्ट्रीचे महत्त्वपूर्ण आणि बारकाईचे काम, शोध घेणे, नकल देणे आदी कामांचा भार आधीच या कार्यालयावर आहे. त्यात आता मूल्यांकन प्रमाणपत्राची व तीन दिवसाच्या अटीची भर पडली. त्यामुळे शासनाने या मूल्यांकन प्रमाणपत्राचा फेरविचार करावा आणि ही अट रद्द करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी