शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांकडून प्रत्यक्ष बैठकीचा अट्टाहास का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 22:14 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अखेर विद्यापीठांमधील अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातदेखील ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असून यासंदर्भात युद्धस्तरावर तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत हे सोमवारी पूर्व विदर्भातील तीन विद्यापीठांची आढावा बैठक घेणार आहेत.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अखेर विद्यापीठांमधील अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातदेखील ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असून यासंदर्भात युद्धस्तरावर तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत हे सोमवारी पूर्व विदर्भातील तीन विद्यापीठांची आढावा बैठक घेणार आहेत. अगोदरच नागपुरात कोरोनाचा प्रकोप वाढत असताना विद्यापीठातील कर्मचारी व अधिकारी काम करत आहेत. अशा स्थितीत मंत्रिमहोदयांना ऑनलाईन बैठक घेणे शक्य आहे. मात्र ते प्रत्यक्ष बैठकीचा अट्टाहास करुन विद्यापीठाला संकटात का टाकत आहेत, असा प्रश्न विद्यापीठ वर्तुळातच उपस्थित होत आहे.उदय सामंत सोमवारी सकाळी ११ वाजता नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय भवनात नागपूर विद्यापीठ तसेच कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.श्रीनिवास वरखेडी यांच्याकडेच गोंडवाना विद्यापीठाचादेखील प्रभार आहे. परीक्षांचा आढावा असल्याने तेथे संबंधित अधिकारी व कर्मचारीदेखील उपस्थित राहतील. याशिवाय विद्यापीठाचे इतर संवैधानिक पद असलेले अधिकारीदेखील उपस्थित राहतील.नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा भवनातील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला व त्यानंतर तो कोरोनाबाधित असल्याचे कळले होते. याशिवाय विविध कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचारी ताप तसेच इतर आजारांनी ग्रस्त आहेत. उगाच कोरोनाचा धोका नको म्हणून अनेक जण कार्यालयात येण्याचा धोका पत्करत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत परीक्षांच्या आयोजनाचे मोठे आव्हान आहे. प्रशासनातील इतर अधिकारीदेखील या कार्यात मदत करत आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनापासून सुरक्षित राहत तयारी करायची आहे. अशा स्थितीत मंत्रिमहोदयांनी प्रत्यक्ष बैठक घेणे योग्य होणार नाही, असे मत एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले.ऑनलाईनचा पर्याय का नाहीराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: ऑनलाईन माध्यमातून आढावा घेण्यावर भर देत आहेत. विविध विद्यापीठांच्या प्राधिकरण बैठकादेखील ऑनलाईन होत आहे. अशा स्थितीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडून ऑनलाईनचा पर्याय का वापरण्यात येत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी डॉ. सामंत यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही तर आम्हाला अद्याप अधिकृत पत्र किंवा मेल आलेला नसल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ.नीरज खटी यांनी स्पष्ट केले. याव्यतिरिक्त इतर काही माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. मात्र शासकीय पातळीवरुन मंत्र्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम प्रसारमाध्यमांना पाठविण्यात आला आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठUday Samantउदय सामंत