शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना सांभाळणाऱ्या आजींची गायनिक टेस्ट कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 23:26 IST

६० वर्षांच्या वरील अंगणवाडी सेविकांना सेवा देण्यासाठी शासनाने फिटनेस टेस्ट आवश्यक केली आहे. यासाठी त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून फिटनेसचे प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. यासाठी त्यांची गायनिक टेस्ट करण्यात येत आहे. या टेस्टवर अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी आक्षेप घेतला असून, ६० वर्षांच्या वयात महिला आजी होतात. आई-वडिलांपेक्षाही आजी मुलांना चांगल्याप्रकारे सांभाळू शकते. मग मुलांना सांभाळणाऱ्या आजींची गायनिक टेस्ट कशाला, असा सवाल अंगणवाडी कर्मचारी संघटनेने शासनाला केला आहे.

ठळक मुद्देअंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सवाल : फिटनेसच्या प्रमाणपत्रासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ६० वर्षांच्या वरील अंगणवाडी सेविकांना सेवा देण्यासाठी शासनाने फिटनेस टेस्ट आवश्यक केली आहे. यासाठी त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून फिटनेसचे प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. यासाठी त्यांची गायनिक टेस्ट करण्यात येत आहे. या टेस्टवर अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी आक्षेप घेतला असून, ६० वर्षांच्या वयात महिला आजी होतात. आई-वडिलांपेक्षाही आजी मुलांना चांगल्याप्रकारे सांभाळू शकते. मग मुलांना सांभाळणाऱ्या आजींची गायनिक टेस्ट कशाला, असा सवाल अंगणवाडी कर्मचारी संघटनेने शासनाला केला आहे.अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे ६५ वर्ष आहे. एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत जेव्हापासून अंगणवाड्या सुरू झाल्या, तेव्हापासून कधीही अंगणवाडी सेविकांकडून फिटनेस प्रमाणपत्र घेण्यात आले नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मानधन वाढीसाठी केलेल्या आंदोलनामुळे शासनाने त्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष केले. शासनाच्या या निर्णयाला परत संघटनांनी विरोध केल्यामुळे ६५ वय कायम ठेवण्यात आले. पण ६० वर्षानंतर त्यांच्याकडून फिटनेस प्रमाणपत्र मागण्यात आले. शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे खेड्यापाड्यातून अंगणवाडी कर्मचारी फिटनेस प्रमाणपत्रासाठी मेयो व मेडिकल रुग्णालयात येत आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या या महिलांना प्रमाणपत्रासाठी किमान ८ ते १० दिवस लागत आहे. त्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट करवून घेण्यात येत आहे. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्यांना प्रकल्प कार्यालयाला द्यायचे आहे. फिटनेस प्रमाणपत्रासाठी वेळ लागत असल्यामुळे प्रकल्पस्तरावरील कार्यालयातील अधिकारी त्यांना सुटी घेण्यास सांगत आहे.अंगणवाडीमध्ये शून्य ते सहा वयोगटाच्या मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण, पोषण आहार, गर्भवती मातांना सेवा पुरविणे, स्तनदा मातांना सेवा देण्याचे काम सेविका व मदतनीसांच्या माध्यमातून करण्यात येते. अंगणवाडीत कुठलेही अवजड उचलणे ठेवण्याचे काम नाही. मुलांचा सांभाळ करणे, हे मुख्य काम येथे होते. शासनाकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांची विडंबना शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केल्याची घोषणा केली, परंतु अद्यापही मानधनवाढ दिलेली नाही. अंगणवाड्यांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती बंद केली आहे. आजपर्र्यंत कधीही न झालेली फिटनेस टेस्ट ६० वर्षाच्या वरच्या कर्मचाऱ्यांना द्यावी लागत आहे. त्यासाठी त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे, वेळ आणि पैसाही खर्च होत आहे. त्यातच गायनिक टेस्ट करून शासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांची विडंबना करीत आहे.चंदा मेंढे, सचिव, अंगणवाडी कर्मचारी संघटना, सीटू,

टॅग्स :nagpurनागपूर