शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
4
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
5
छत्तीसगच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
6
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
7
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
8
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
9
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
10
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
11
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
12
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
13
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
14
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
15
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
16
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
17
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
18
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
19
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
20
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."

रात्रकालीन शाळा शिक्षकांना निवृत्ती वेतन का नाही? हायकोर्टाची विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 8:29 PM

रात्रकालीन शाळांच्या शिक्षकांना निवृत्ती वेतन का दिले जात नाही अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला केली व यावर आठ आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्दे राज्य सरकारला नोटीस जारी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रात्रकालीन शाळांच्या शिक्षकांना निवृत्ती वेतन का दिले जात नाही अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला केली व यावर आठ आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.यासंदर्भात रमेश सौंदरकर व इतर सात शिक्षकांनी रिट याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी स्पष्ट केल्यानुसार अंशकालीन शिक्षकाच्या एकूण सेवेपैकी अर्धी सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरणे आवश्यक आहे. असे असताना अंशकालीन पद्धतीने कार्य करणाऱ्या रात्रकालीन शाळांच्या शिक्षकांना निवृत्ती वेतनासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. हा या शिक्षकांवर अन्याय आहे. महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी नियमात निवृती वेतनासाठी पूर्णवेळ शिक्षक पात्र असल्याचे नमूद करण्यात आले आहे. परंतु, रात्रकालीन शाळेत पूर्णवेळ शिक्षकाची पदे नसतात. त्यामुळे हा निकषही रात्रकालीन शाळांच्या शिक्षकांवर अन्याय करणारा आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. आनंद परचुरे व अ‍ॅड. देवदत्त देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTeacherशिक्षक