शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विधी विद्यापीठांना निधी वाटप करताना भेदभाव का केला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 22:48 IST

राज्यातील तीन महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठांना कमीजास्त निधी वाटप करणे राज्य सरकारवर शेकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे प्रकरण गंभीरतेने घेऊन निधी वाटपात भेदभाव का केला, अशी विचारणा सरकारला केली आहे तसेच, यावर येत्या सोमवारपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाची सरकारला विचारणा : सोमवारपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील तीन महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठांना कमीजास्त निधी वाटप करणे राज्य सरकारवर शेकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे प्रकरण गंभीरतेने घेऊन निधी वाटपात भेदभाव का केला, अशी विचारणा सरकारला केली आहे तसेच, यावर येत्या सोमवारपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला आहे.संबंधित प्रकरणावर बुधवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या प्रतिज्ञापत्राकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, राज्य सरकारने २०१६-१७ या आर्थिक वर्षात मुंबईतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला ९ कोटी ५९ लाख ९८ हजार ४४६ रुपये तर, नागपुरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला ४ कोटी ५६ लाख ३५ हजार ५४२ रुपये दिले. तसेच, २०१७-१८ या आर्थिक वर्षात मुंबईतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला १८ कोटी २९ लाख ८३ हजार २५९ रुपये, नागपुरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला ४ कोटी ४६ हजार रुपये तर, औरंगाबाद येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला २ कोटी ७१ लाख ६५ हजार रुपये वाटप केले. निधी वितरणातील हा भेदभाव न्यायालयाला खटकला. त्यामुळे सरकारला यावर स्पष्टीकरण मागण्यात आले.त्या आदेशाचे पालननागपुरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला शैक्षणिक व प्रशासकीय खर्चासाठी ३ कोटी रुपये देण्यात यावे, असा अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला होता. त्यानंतर २८ फेब्रुवारी २०१८ रोजी विद्यापीठाला दीड कोटी रुपये देण्यात आले. गेल्या ७ मार्च रोजी न्यायालयाने उर्वरित रक्कम एक आठवड्यात देण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, सरकारने विद्यापीठाला १३ मार्च रोजी ८० लाख ४६ हजार तर, १५ मार्च रोजी ७० लाख रुपये देऊन न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले.बार असोसिएशनची याचिकायासंदर्भात हायकोर्ट बार असोसिएशनने २०१६ मध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. दरम्यान, न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांमुळे हे विद्यापीठ २०१६-२०१७ सत्रापासून कार्यान्वित झाले. विद्यापीठ कॅम्पसकरिता वारंगा येथे ७५ एकर जमीन देण्यात आली. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह मिळाले. कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. असोसिएशनतर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक कामकाज पहात आहेत.

टॅग्स :universityविद्यापीठnagpurनागपूर