शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा का नोंदविला नाही?

By admin | Updated: June 17, 2014 00:46 IST

जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुदीप जयस्वाल यांच्या तक्रारीवरून खुनाच्या प्रयत्नाचा (३०७) गुन्हा का नोंदविला नाही, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने करून याप्रकरणी

हायकोर्टाची विचारणा : जरीपटका पोलिसांवर प्रश्नचिन्हनागपूर : जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुदीप जयस्वाल यांच्या तक्रारीवरून खुनाच्या प्रयत्नाचा (३०७) गुन्हा का नोंदविला नाही, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने करून याप्रकरणी जरीपटका पोलिसांना उद्या, बुधवारी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.जयस्वाल यांनी पोलीस तक्रारीमध्ये त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला होता. परंतु, जरीपटका पोलिसांनी यासंदर्भातील गुन्हा नोंदविला नाही. आज, सोमवारी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व चंद्रकांत भडंग यांनी उपरोक्त निर्देश दिलेत. पारदर्शक तपास होण्यासाठी संबंधित प्रकरण जरीपटका पोलिसांकडून काढून दुसऱ्या संस्थेकडे हस्तांतरित करण्यासाठी जयस्वाल यांनी उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. अ‍ॅड. जयस्वाल क्लार्क टाऊनस्थित सुंदर जीवन अपार्टमेंटमध्ये राहतात. याच अपार्टमेंटमध्ये कावेश तलवार व प्रवीण तलवार यांचा फ्लॅट आहे. तलवार बंधूंनी घराचे बांधकाम काढले होते. त्यावरून अ‍ॅड. जयस्वाल यांनी सोसायटीच्या अध्यक्षांकडे तक्रार केली होती. काही दिवसांनंतर बांधकामावरूनच अ‍ॅड. जयस्वाल व तलवार कुटुंबीयांचा वाद झाला. दरम्यान, तलवार बंधूंनी दगड मारल्यामुळे जयस्वाल यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तत्पूर्वी जयस्वाल यांनी तलवार कुटुंबातील महिलेला अश्लील शिवीगाळ व विनयभंग केल्याचा आरोप आहे. दोन्ही पक्षांनी जरीपटका पोलिसांकडे एकमेकांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. यावरून अ‍ॅड. जयस्वाल यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९४, ३५४ (अ)(४), ५०६ (ब), ३२३, तर तलवार बंधूंविरुद्ध भादंविच्या कलम २९४, ३२३, ३२५, ३५५, ५०६ (ब) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वकिलांच्या अधिकारासाठी संघर्ष करताना याआधी जरीपटका पोलिसांसोबत अनेकदा वाद झाला. यामुळे ते पूर्वग्रहदूषित आहेत. त्यांचा तपास पारदर्शक नाही. वैद्यकीय तपासणीत हाताला दोन फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट झाले आहे. दगड मारून हत्या करण्याचा प्रयत्न झाला आहे. यानंतरही पोलिसांनी भादंविच्या कलम ३०७ (खूनाचा प्रयत्न) व २२६ अन्वये गुन्हा नोंदवला नाही. यामुळे जरीपटका पोलिसांकडून प्रकरणाचा तपास काढण्याची पोलीस आयुक्तांना मागणी केली होती, पण त्यांनी यासंदर्भात काहीच निर्णय घेतला नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.(प्रतिनिधी)