शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
4
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
5
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
6
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
7
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
8
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
9
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
10
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
11
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
12
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
13
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
15
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
16
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
17
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
18
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
19
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
20
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे

कोरोनाबाधितांमुळे कंपनी एक महिना बंद कशासाठी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:16 IST

औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यास कंपनी दोन वा तीन दिवस बंद ठेवून पुन्हा सुरू करण्याचे शासनाचे धोरण आहे. पण तसे होताना दिसत नाही. कंपनी पूर्णपणे बंद करणार नाही, अशी ग्वाहीही जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योगांना भेट देऊन केली होती. त्यानंतरही अधिकारी कामगारांची तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करीत आहेत. हे क्वारंटाईन जवळपास २८ दिवसांचे असल्याने कंपनीत कामावर कुणीही कामगार राहत नाहीत. त्यामुळे कंपनी पूर्णपणे बंद पडत आहे.

ठळक मुद्देउद्योजकांना त्रास : कामगार देतात ईएसआयसीकडे सुटीचा अर्ज

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यास कंपनी दोन वा तीन दिवस बंद ठेवून पुन्हा सुरू करण्याचे शासनाचे धोरण आहे. पण तसे होताना दिसत नाही. कंपनी पूर्णपणे बंद करणार नाही, अशी ग्वाहीही जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योगांना भेट देऊन केली होती. त्यानंतरही अधिकारी कामगारांची तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करीत आहेत. हे क्वारंटाईन जवळपास २८ दिवसांचे असल्याने कंपनीत कामावर कुणीही कामगार राहत नाहीत. त्यामुळे कंपनी पूर्णपणे बंद पडत आहे. ही बाब हिंगणा एमआयडीसी औद्योगिक वसाहतीत कोरोनाबाधितामुळे ड्युरवेल्ड आणि हसीफ फार्मा या दोन कंपन्यांमध्ये घडली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी हिंगणा एमआयडीसीच्या पदाधिकाऱ्यांसोबत या संदर्भात संवाद साधला होता. कंपनी पूर्णपणे बंद होणार नाही, असे आश्वासन दिले होते. पण कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास १४ दिवस इन्स्टिट्युशनल आणि १४ दिवस होम क्वारंटाईन असे एकूण कामगारांना २८ दिवस क्वारंटाईन व्हावे लागते. त्यामुळे कंपन्यांमधील काम पूर्णपणे ठप्प पडत असल्याचा उद्योजकांचा सूर आहे.कामगार ईएसआयसीमध्ये करतात सुटीचे अर्जएखाद्या कंपनीत कामगार कोरोनाबाधित निघाल्यास कामगार क्वारंटाईनसह ईएसआयसीमध्ये सुटीचे अर्ज करतात. शिवाय क्वारंटाईनच्या नावाखाली कामावर येत नाहीत. त्यामुळे कंपनी बंद करावी लागते. ही वेळ कंपनीवर येऊ नये.चंद्रशेखर शेगावकर, अध्यक्ष, हिंगणा एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन.अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावाकोरोनाबाधितामुळे एखादी कंपनी बंद पडू नये याकरिता अधिकाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा. रुग्णावर उपचार करून संबंधित कामगारांची तपासणी करून कामावर येण्यास सांगावे. शिवाय संपूर्ण परिसर सॅनिटाईझ्ड करून दोन ते तीन दिवसात कंपनी सुरू करावी.प्रदीप खंडेलवाल, अध्यक्ष, बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशन.कंपनीच्या विकासात कोरोनाची बाधानागपूर जिल्ह्यात सध्या २५५० उद्योग सुरू असल्याची नोंद आहे. या उद्योगांमध्ये ५५ हजारांच्या आसपास कामगार काम करीत असून ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कंपनीत विविध वस्त्यांमधून कामगार येत असल्याने मालकाने त्यांची नियमानुसार तपासणी करणे आवश्यक आहे. जर एखाद्या कंपनीत कोरोना रुग्ण निघाल्यास कंपनी दोन ते तीन दिवसाऐवजी अनेक दिवसांसाठी बंद होते. प्रशासनाने संपूर्ण परिसर सॅनिटाईज्ड करून कंपनी लवकरात लवकर कशी सुरू होईल, यावर अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे काही उद्योजकांनी लोकमतशी बोलताना सांगितले. सध्या कमी कामगार संख्येत उत्पादन सुरू असून कंपन्याही सरासरी ६० ते ७० टक्के क्षमतेने सुरू आहेत.उत्पादन होईलच, प्रारंभी जीव महत्त्वाचाहिंगणा येथील कारखान्यात कोरोनाचे जास्त रुग्ण मिळाल्याने कंपनी सुरू होण्यास उशीर झाला. पण एखाद्या कंपनीत कोरोना रुग्ण आढळून येत असेल तर असोसिएशनच्या अध्यक्षांसोबत संपर्क साधून जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देणे बंधनकारक आहे. सॅनिटायझेशन, कामगारांच्या सुट्यांमध्ये भ्रष्टाचार होऊ नये. एका युनिटसाठी पूर्ण कंपनी बंद होऊ नये. सर्वांनी हेल्पलाईन क्रमांकाच्या संपर्कात राहावे आणि संपूर्ण नियमांचे पालन करावे.सुरेश राठी, अध्यक्ष, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMIDCएमआयडीसी