शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

-तर विदर्भात येताच कशाला ? : यंदाचे हिवाळी अधिवेशन केवळ सहाच दिवस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 20:19 IST

महाविकासआघाडीच्या शासनकाळातील पहिले अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. याचा कालावधी सहा दिवसाचाच राहण्याची दाट शक्यता आहे.

ठळक मुद्देहा तर केवळ औपचारिकतेचा ‘फार्स’ विदर्भातील प्रश्नांना न्याय मिळणार कसा ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील सहा दशकांपासून उपेक्षित असलेल्या विदर्भाला कधीतरी ‘अच्छे दिन’ येतील व ‘मायबाप सरकार’ येथील जनता व शेतकऱ्यांना न्याय देईल, अशी अपेक्षा दर हिवाळी अधिवेशनात व्यक्त होते. परंतु दरवेळी वैदर्भीयांच्या पदरी निराशाच येते. नागपूर कराराला हरताळ फासत अधिवेशनाचा कालावधी दोन किंवा जास्तीत जास्त तीन आठवडे इतकाच राहतो. त्यामुळे यात विधायक बाबींवर चर्चेसाठी पुरेसा वेळच मिळत नाही. महाविकासआघाडीच्या शासनकाळातील पहिले अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. याचा कालावधी सहा दिवसाचाच राहण्याची दाट शक्यता आहे. अवघ्या सहा दिवसात सभागृहाचे कामकाज होणार तरी किती आणि विदर्भातील प्रश्नांना न्याय मिळणार तरी किती, असा प्रश्न उपस्थित होत आहे. केवळ सहा दिवसासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करुन जर जनतेच्या पदरी काहीच आश्वासक पडत नसेल तर मग विदर्भात येताच कशाला, केवळ सहलीसाठीच का, असा प्रश्न वैदर्भीयांनी उपस्थित केला आहे. अधिवेशनातील औपचारिकतेचा ‘फार्स’ असेच याला म्हणावे का, असा सवालही केला जात आहे.१९५३ साली विदर्भाला संयुक्त महाराष्ट्रात सामील करुन घेण्यासाठी २८ सप्टेंबर १९५३ रोजी झालेल्या नागपूर करारानुसार उपराजधानीत वर्षातून एक अधिवेशन घेणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे हे अधिवेशन महिनाभराचे तरी असले पाहिजे. मात्र सुरुवातीच्या काळापासून सर्वच शासनकर्त्यांनी हिवाळी अधिवेशनाला फारसे गंभीरतेने घेतलेच नाही. गुलाबी थंडीत दोन आठवड्यांची ‘पिकनिक’ अन् हुरडा पार्टी असेच स्वरुप याला आले. दरवर्षी हिवाळ्यात नागपुरात अख्खे मंत्रालय येते. सचिवालयाचे कामकाज सुरू होण्यापासून ते अगदी ‘व्हीव्हीआयपी’ नेत्यांच्या येण्यापर्यंत नागपुरात अधिवेशनाची धूम असते. परंतु मागील काही वर्षांत एकदाही अधिवेशनाचे कामकाज २० दिवसाहून अधिक काळ झाले नाही. त्यातही विविध मुद्यांवरुन होणाऱ्या गोंधळात दोन्ही सभागृहांचे कामकाज अनेकदा तहकूब होते. अशा स्थितीत मूळ मुद्यांवर चर्चाच होत नाही.हिंमत असेल तर करा नागपूर कराराचे पालननागपूर करारानुसार अधिवेशन हे सहा आठवड्यांचे व्हावे असे ठरले होते. पहिले हिवाळी अधिवेशन तर १० नोव्हेंबर ते १६ डिसेंबर १९६० इतक्या काळासाठी चालले होते. नंतर त्याचा कालावधी कमी होत गेला. दुसरा आठवडा संपून तिसऱ्या आठवड्यात कामकाज व्हावे, अशी ना सत्ताधारी ना विरोधकांची इच्छा असते. हिवाळी अधिवेशन म्हणजे वैदर्भीयांचा पाहुणचार अशी विशेषणे वापरली जातात. परंतु पाहुणचारासाठी सहा दिवसांचा कालावधी पुरेसा पडत नाही. मग कामकाजाला हा वेळ कसा काय पर्याप्त राहणार आहे. त्यामुळेच हिंमत असेल तर नव्या सरकारने नागपूर कराराचे पालन करून एक नवा पायंडा पाडला पाहिजे.नागपुरात आजवर झालेली अधिवेशने व कामकाजाचे दिवस१९६० (२७ दिवस), १९६१ (२५ दिवस ), १९६४ (२३ दिवस )१९६५ ( १५ दिवस ), १९६६ (२४ दिवस), १९६७ (१७ दिवस) , १९६८ (२८ दिवस) , १९६९ (२४ दिवस), १९७० ( १८ दिवस), १९७१ (२६ दिवस), १९७२ (२० दिवस) , १९७३ (२५ दिवस), १९७४ (२५ दिवस), १९७५ (१७ दिवस), १९७६ (१५ दिवस), १९७७ (१४ दिवस), १९७८ (१४ दिवस), १९८० (९ दिवस) १९८१ (१५ दिवस), १९८२ (१० दिवस), १९८३ (१५ दिवस), १९८४ (६ दिवस), १९८६ (१५ दिवस), १९८७ (१५ दिवस), १९८८ (१५ दिवस), १९८९ (५ दिवस) , १९९० (१४ दिवस) , १९९१ (१४ दिवस), १९९२ (६ दिवस), १९९३ (१४ दिवस), १९९४ (८ दिवस), १९९५ (१४ दिवस), १९९६ (१० दिवस), १९९७ (८ दिवस), १९९८ (१२ दिवस), १९९९ (१० दिवस), २००० (१५ दिवस), २००१ (१० दिवस), २००२ (८ दिवस), २००३ ( १० दिवस), २००४ (११ दिवस), २००५ (१० दिवस), २००६ ( १० दिवस), २००७ ( ११ दिवस), २००८ (१२ दिवस),२००९ (१० दिवस), २०१० (१२ दिवस), २०११ (११ दिवस), २०१२ (१० दिवस), २०१३ (१० दिवस), २०१४ (१३ दिवस), २०१५ (१३ दिवस), २०१६ (१० दिवस), २०१७ (१० दिवस), २०१८ (एकमेव पावसाळी अधिवेशन -१३ दिवस)सचिवालय सोमवारपासून नागपुरातहिवाळी अधिवेशनला येत्या १६ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. मुंबई विधिमंडळातील कर्मचारी व आवश्यक कागदपत्र नागपुरात पोहोचले आहेत. शुक्रवारी जवळपास ५०० कर्मचारी दाखल झाले. उद्या व परवा अधिकारीही दाखल होतील. येत्या सोमवारपासून विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज सुरु होईल.हिवाळी अधिवेशनाची तयारी जोरात सुरु आहे. सोमवारपासून विधिमंडळ सचिवालयातील सुरक्षारक्षक विधानभवनाचा ताबा घेतील. सचिवालयाच्या कामकाजाला सुरूवात होईल. विधानसभा अध्यक्षांकडून हिवाळी अधिवेशनाची घोषणा झाल्यापासून येथील स्थानिक प्रशासनाच्या कामालाही गती आली आहे. शुक्रवारी विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी तयारी व सुरक्षेचा आढावाही घेतला. सोमवारी ९ डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर व उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडून विधिमंडळ अधिवेशनाच्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहेत.शुक्रवारी दुपारच्या सुमारास मुंबईहून विधिमंडळ सचिवालयातील बहुतांश कर्मचारी नागपुरात पोहोचले. त्यांच्यासह महत्त्वाची विविध कागदपत्रे, फायलीही ट्रकच्या माध्यमातून पोहचले असून, विधिमंडळात फाईली, कागदपत्रे लावणे सुरू करण्यात आली आहे. शनिवार व रविवार या दोन दिवसात संपूर्ण कामे आटोपली जातील आणि सोमवारपासून सचिवालयाच्या कामाला सुरुवात होईल.विधिमंडळातील अधिकारी उद्या घेणार आढावाहिवाळी अधिवेशनाच्या तयारी संदर्भातील आढावा घेण्यासाठी मुंबई विधिमंडळातील अधिकारी हे येत्या रविवारी, ८ तारखेला नागपुरात येणार असल्याची माहिती आहे. नागपुरातील अधिकारी हे मुंबईतील विधिमंडळ सचिवालयतील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळेच ७ तारखेपर्यंत सर्व कामे आटोपण्यासाठी सर्व कामाला लागले आहेत.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर