शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
4
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
5
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
6
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
7
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
8
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
9
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
10
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
11
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
12
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
13
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
14
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
15
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
16
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
17
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
18
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
19
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

अवनीला ठार केल्याचा एवढा बाऊ कशाला; विजय वडेट्टीवार यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 15:43 IST

एखादा वाघ १३ लोकांचे बळी घेत असेल, अशा परिस्थितीत त्याला गोळी झाडून ठार के ले असेल तर या गोष्टीचा एवढा बाऊ कशाला असा सवाल काँगे्रसचे विधीमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टेवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देमारण्याची पद्धत चुकीचीपण त्यापेक्षा शेतकऱ्यांचे बळी महत्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :अवनी किंवा टी-१ नावाच्या वाघिणीच्या मृत्यूवरून देशभरात वादंग सुरू आहे. आठवडभरापासून या वाघिणीला मारताना नियमांचा अवलंब योग्य प्रकारे केला गेला नसल्याचे आरोप होत आहेत. मारण्याची पद्धत चुकीचीच होती. परंतु मागील तीन वर्षात वाघांच्या हल्ल्यात २३ लोकांचे बळी गेलेत. एखादा वाघ १३ लोकांचे बळी घेत असेल, त्याला पकडण्यात यश येत नसेल अशा परिस्थितीत त्याला गोळी झाडून ठार के ले असेल तर या गोष्टीचा एवढा बाऊ कशाला असा सवाल काँगे्रसचे विधीमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टेवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, किशोर गजभिये आदी उपस्थित होते.गेल्या काही वर्षात २६ वाघांचे बळी गेले आहेत. कधी आपसातील झुंज, विजेचा धक्का लागून तर कधी कालव्यात पडल्याने ते मरण पावले. पर्यावरण संतुलनासाठी वाघ वाचला पाहिजे. परंतु शेतकऱ्यांचे बळी त्याहून महत्वाचे आहेत. वाघाला ठार केले म्हणून ह्ळहळ व्यक्त करण्याची गरज नाही. जंगललगतच्या ४२ गावातील नागरिक दहशतीत जीवन जगतात. जंगल परिसरातील शेतीचे संरक्षण वन विभागाने केले पाहिजे. वन्य प्रान्यांनी गावाकडे येवू नये यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी १०० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना सोलर कुंपण उपलब्ध केले पाहिजे. वन्य प्राण्यापासून शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. वाघांना विदर्भातील लोकांनीच पोसायचे का? सिमेंटच्या जंगलातील लोकांना जंगलालगत राहणाऱ्या लोकांच्या समस्या कशा कळतील. एनजीओंना वस्तुस्थिती माहित नाही. आरएसएस आदीवासींना वनवासी म्हणतात. तशातलाच हा प्रकार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.पांढरकवडा भागात दहशत निर्माण करणाऱ्या वाघिणीला काही दिवसापूर्वी वन विभागाच्या पथकाने ठार मारले. या वाघिणीला आधी बेशुद्ध न करता तिला गोळी घालण्यात आली असल्याचा आरोप होत आहे. यावरून राजकीय वातावण तापलेले असतानाच विजय वडेट्टीवार यांनी, आता ही चर्चा खूप झाली, ठार मारण्याचा बाऊ करण्याची गरज नाही अशी भूमिका मांडली.

तुकाराम मुंडे यांना नागपूरला आणाभाजपाचे नेते स्वच्छ कारभाराचा दावा करतात. परंतु नागपूर महापालिकेतील भ्रष्टाचार सर्वश्रृत आहे. कराचा बोजा जनतेवर लादला जात आहे. महापालिकेतील भाजपा नेत्यांत अंतर्गत वाद आहेत. शासन निधी वेतनावर खर्च करावा लागत आहे. महापालिकेचा कारभार खरोखरच पारदर्शी व स्वच्छ करायचा असेल तर आयुक्त म्हणून तुकाराम मुुंडे यांना नागपुरात आणा अशी मागणी विजय वडेट्टीवार व अतुल लोंढे यांनी केली.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारTigerवाघ