शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांना रिपब्लिकन पक्षांचे वावडे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 22:53 IST

असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमशी गठबंधन करणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षांना विचारात घेतले नाही. एमआयएमशी जुळवून घेणाऱ्या आंबेडकरांना रिपब्लिकन पक्षांचे वावडे का आहे, असा टीकात्मक सवाल पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जागेंद्र कवाडे यांनी केला आहे.

ठळक मुद्देजोगेंद्र कवाडे यांचा सवाल

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमशी गठबंधन करणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षांना विचारात घेतले नाही. एमआयएमशी जुळवून घेणाऱ्या आंबेडकरांना रिपब्लिकन पक्षांचे वावडे का आहे, असा टीकात्मक सवाल पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जागेंद्र कवाडे यांनी केला आहे.मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत प्रा. कवाडे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनापूर्वी येत्या १७ आॅक्टोबरला आयोजित पीरिपाच्या राष्ट्रीय मेळावा व अधिवेशनाबाबत माहिती दिली. काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी, सपाचे आमदार अबू आझमी आदींना या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिल्याचे प्रा. कवाडे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अ‍ॅड. आंबेडकर यांच्या भूमिकेवर टीका केली. देशात जातीय आणि धार्मिक उन्मादाला योजनाबद्ध रीतीने उत्तेजन देणाऱ्या रा.स्व.संघप्रणीत सत्तारूढ भाजपाला नमविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी सेक्युलर मतांना एकत्रित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र भारिप बहुजन महासंघाने एमआयएमशी युती केल्याने सेक्युलर मतांचे धु्रवीकरण होईल आणि भाजपाला लाभ मिळेल, अशी टीका त्यांनी केली. प्रा. कवाडे यांनी गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्यांचाही निषेध केला. पंतप्रधानांच्या गृहराज्यात अशाप्रकारे कृत्य लाजिरवाणे असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी उत्तर भारतीयांकडून मुंबई बंद पाडण्याच्या संजय निरुपम यांच्या वक्तव्यावरही टीका केली. पत्रपरिषदेत थॉमस कांबळे, अरुण गजभिये, भगवानदास भोजवानी, संदीप मेश्राम, विजय पाटील, बाळूमामा कोसमकर, सारंग लांजेवार, भीमराव राऊत आदी उपस्थित होते.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरJogendra kawadeजोगेंद्र कवाडे