शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये भरती का केले जात नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 19:48 IST

नागपूरमध्ये ‘कोरोना रुग्णांचा आकडा २२ हजारांच्या पार तर मृतांची संख्या ८२५ वर गेली आहे. कोविड रुग्णांसाठी खासगी व शासकीय रुग्णालयात जागा नाही. भरती होण्यासाठी रुग्णांना भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देकोरोना रुग्णांची उपचारासाठी भटकंतीमेयो, मेडिकलमध्येही क्षमतेच्या अर्धेच रुग्णखासगी रुग्णालयांमध्ये फक्त ८५० बेड उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरमध्ये ‘कोरोना रुग्णांचा आकडा २२ हजारांच्या पार तर मृतांची संख्या ८२५ वर गेली आहे. कोविड रुग्णांसाठी खासगी व शासकीय रुग्णालयात जागा नाही. भरती होण्यासाठी रुग्णांना भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे महापालिकेची पाच रुग्णालये सुसज्ज असल्याचे सांगत ४६० बेडची व्यवस्था करण्यात आली होती. वेळप्रसंगी या रुग्णालयांचा कोविड केअर सेंटर म्हणून वापर केला जाईल, असा दावा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला होता. मात्र यातील फक्त एका रुग्णालयात ७ कोविड रुग्ण दाखल असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. उर्वरित रुग्णालयात एकही कोविड रुग्ण दाखल नाही. अशा परिस्थितीत रुग्णांनी उपचार कुठे घ्यावेत, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये भरती करून घेण्याची व्यवस्था का केली जात नाही, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव दररोज वाढत असल्याने सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. उपचारासाठी लोक रुग्णालयांमध्ये धाव घेत आहेत. मनपाच्या गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली स्त्री रुग्णालय, इमामवाडा येथील आयसोलेशन रुग्णालय, काटोल रोड येथील के.टी.नगर रुग्णालय व सदर येथील आयुष रुग्णालय आदींचा यात समावेश आहे. पाचपावली सूतिकागृह असल्याने येथे कोविड केअर सेंटर सुरू करणे योग्य होणार नाही. परंतु उर्वरित चार रुग्णालयांत अजूनही कोविड रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. तर इंदिरा गांधी रुग्णालयात फक्त कोविड लक्षणे असलेले ७ रुग्ण दाखल आहेत. मनपा प्रशासनाकडून कोरोना रुग्णांना उपचार मिळत असल्याचा दावा केला जात असला तरी वस्तुस्थिती मात्र तशी नाही. महापालिका प्रशासनाने केवळ प्रसिद्धी मिळिवण्यासाठी संबंधित चार दवाखाने सज्ज असल्याचे सांगितले होते का, संबंधित दवाखान्यांमध्ये आवश्यक सुविधा का पुरिवल्या गेल्या नाहीत, असे प्रश्न उपिस्थत झाले आहेत. या संदर्भात वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) डॉ. योगेन्द्र सवाई यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी माहिती देण्याचे टाळले.मनपाची रुग्णालये व बेड क्षमताइंदिरा गांधी रुग्णालय-१३०पाचपावली -१३०केटीनगर -१३०आयसोलेशन -६०आयुष रुग्णालय -४०खासगी रुग्णालयांमध्ये फक्त ८५० बेड उपलब्धमहापालिकेचे वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) डॉ. योगेन्द्र सवाई यांनी खासगी रुग्णालयात १,८७६ बेड उपलब्ध असल्याची माहिती महापौरांनी घेतलेल्या बैठकीत दिली होती. प्रत्यक्षात खासगी रुग्णालयांत कोविड रुग्णांसाठी सध्या ८५० बेड उपलब्ध असल्याची धक्कादायक बाब चौकशी समितीच्या निदर्शनास आली.मेयो, मेडिकलमध्ये क्षमतेच्या अर्धेच रुग्णकोविडची लागण झाल्यानंतर मेयो, मेडिकल रुग्णालयात दाखल होण्यासाठी जाणाऱ्या रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याचे कारण सांगून दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जाते. वास्तविक मेयो, मेडिकल रुग्णालयांत प्रत्येकी ६०० बेडची व्यवस्था आहे. मेयो रुग्णालयात ३४० तर मेडिकलमध्ये २९५ इतके रुग्ण उपचार घेत असून क्षमतेच्या तुलतेन अर्धेच रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली होती.खासगी रुग्णालयांनी बेड दुप्पट करावेमनपाच्या पाच रुग्णालयांत गरज भासल्यास कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येईल, असे मनपा आयुक्तांती सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात इंदिरा गांधी रुग्णालयात जेमतेम ७ रुग्ण आहेत. इतर ठिकाणी एकही कोविड रुग्ण नाही. कोरोनाची लक्षणे असलेल्यांना होम आयसोलेशनचा सल्ला दिला जातो. परंतु घरी स्वतंत्र व्यवस्था असेल तरच होम आयसोलेशन योग्य आहे. कोविड केअर सेंटमध्ये दाखल असल्यास वेळप्रसंगी तातडीने उपचार मिळतात. खासगी रुग्णालयात सध्या ८५० बेडची व्यवस्था आहे. त्यांनी ती आठवडाभरात दुप्पट करावी. मेयो, मेडिकल रुग्णालयांनी १०० टक्के क्षमतेने रुग्णांवर उपचार करणे गरजेचे आहे.वीरेंद्र कुकरेजा, आरोग्य सभापती, मनपा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाhospitalहॉस्पिटल