शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
2
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
3
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
4
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
5
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
6
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
7
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
8
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
9
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
10
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
11
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
12
आजचा अग्रलेख: पुन्हा गोंधळात गोंधळ!
13
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
14
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
15
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
16
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
17
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
18
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
19
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
20
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ निवडणूकांत सरशी कुणाची ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 22:36 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणुकांचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. ३६ तासांच्या ‘मॅरेथॉन’ मतमोजणीनंतर डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांच्या मार्गदर्शनातील ‘सेक्युलर पॅनल’ व डॉ.बबन तायवाडे यांच्या अध्यक्षतेखालील ‘यंग टीचर्स असोसिएशन’मध्ये तुल्यबळ लढत दिसून आली.

ठळक मुद्दे‘सेक्युलर’, ‘यंग टीचर्स’ दोघांचाही अव्वल असल्याचा दावाविधिसभा, अभ्यास मंडळात ‘यंग टीचर्स’चे वर्चस्वशिक्षण मंचाला अंशत: दिलासा३६ तास चालली ‘मॅरेथॉन’ मतमोजणी

आॅनलाईन लोकमतनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणुकांचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. ३६ तासांच्या ‘मॅरेथॉन’ मतमोजणीनंतर डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांच्या मार्गदर्शनातील ‘सेक्युलर पॅनल’ व डॉ.बबन तायवाडे यांच्या अध्यक्षतेखालील ‘यंग टीचर्स असोसिएशन’मध्ये तुल्यबळ लढत दिसून आली. मात्र विद्यापीठात ‘नंबर वन’ कोण, यावरून ‘यंग टीचर्स’ आणि ‘सेक्युलर’मध्ये ‘सोशल मीडिया’वरून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत.विधिसभा व विद्वत् परिषदेतील आकडेवारी लक्षात घेतली तर ‘सेक्युलर’ने ‘यंग टीचर्स’च्या तुलनेत अवघी एक जागा जिंकत निसटती आघाडी घेतली. मात्र विधिसभा व शिक्षण मंडळात ‘यंग टीचर्स’च्या उमेदवारांनी सर्वात जास्त प्रमाणात विजय मिळविला. दुसरीकडे विद्यापीठ शिक्षण मंचचे गणित मात्र विस्कटल्याचे चित्र आहे.नागपूर विद्यापीठाच्या सिनेट-विद्वत् परिषद आणि अभ्यास मंडळासाठी शनिवारी रेकॉर्डब्रेक ९२.८२ टक्के मतदान झाले. विधिसभेच्या २९, विद्वत् परिषदेच्या ८ आणि ५२ अभ्यास मंडळाच्या प्रत्येकी ३ जागांसाठी सोमवारी मतमोजणी सुरू झाली होती. सोमवारीमध्यरात्रीपर्यंत जाहीर झालेल्या निकालानुसार विधिसभा व विद्वत् परिषद मिळून ‘यंग टीचर्स’ने आघाडी घेतली होती. मात्र मंगळवारी विधिसभेतील शिक्षक गटातील निकालानंतर चित्र पालटले. या दोन्ही प्राधिकरणांत ‘सेक्युलर’ने १२ जागांवर विजय मिळविला, तर ‘यंग टीचर्स’चे ११ उमेदवार निवडून आले. शिक्षण मंचच्या ७ उमेदवारांनी विजय मिळविला. तर शिक्षकांची मोठी सदस्यसंख्या असूनदेखील ‘नुटा’ला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले.आम्हीच अव्वल : वंजारीप्राधिकरण निवडणुकांत अव्वल कोण, यात वादाचा विषयच नाही. आम्ही विधिसभा व विद्वत् परिषदेत १२ जागांवर विजय मिळवत प्रत्यक्ष बाजी मारली आहे. अभ्यास मंडळाचा येथे विषय येत नाही, असे मत ‘सेक्युलर पॅनल’चे नेतृत्व करणारे अ‍ॅड.अभिजित वंजारी यांनी व्यक्त केले.तिन्ही प्राधिकरणांत आम्हीच ‘टॉप’ : तायवाडेही निवडणूक विधिसभा, विद्वत् परिषद व अभ्यास मंडळांसाठी होती. विधिसभेत आम्ही अव्वल आहोत व १९ अभ्यास मंडळात आमचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे खरे वर्चस्व आमचेच आहे. आम्ही पुराव्यांशिवाय बोलत नाही, असा दावा ‘यंग टीचर्स असोसिएशन’चे अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे यांनी केला आहे.मंचची विद्वत्मध्ये चांगली कामगिरीविधीसभेत फटका बसलेल्या मंचने विद्वत् परिषदेत मात्र चांगली कामगिरी केली. एकूण आठ जागांपैकी तीन ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले. उर्वरित पाच जागांपैकी तीन ठिकाणी मंचच्या उमेदवारांनी बाजी मारली. तर ‘सेक्युलर’चे दोन उमेदवार निवडून आले. जर बिनविरोध उमेदवारांसह एकूण आकडेवारी लक्षात घेतली तर शिक्षण मंचचे चार, ‘सेक्युलर’चे तीन व ‘यंग टीचर्स’चा एक उमेदवार निवडून आला. विद्वत् परिषदेत ‘यंग टीचर्स’चे गणित चुकल्याचे दिसून आले.बिनविरोध उमेदवार कुणाचे ?दरम्यान, विधिसभा व विद्वत् परिषद मिळून एकूण पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले. यात विधिसभेत चंदनसिंह रोटेले व सुधीर फुलझेले तर विद्वत् परिषदेत वर्षा धुर्वे, आसावरी दुर्गे व वसंत राठोड यांचा समावेश आहे. यातील रोटेले, फुलझेले व धुर्वे हे उमेदवार आपले असल्याचा दावा ‘सेक्युलर’कडून करण्यात आला आहे. तर रोटेले व फुलझेले हे आम्हीच उभे केलेले उमेदवार असून ते आम्हालाच समर्थन करतील, असा दावा ‘यंग टीचर्स‘ व शिक्षण मंचाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे हे उमेदवार नेमके कुणाचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात डॉ.चंदनसिंह रोटेले यांना विचारणा केली असता सर्वांनाच मी जवळचा वाटत आहे. मात्र मी सध्या कोणत्या ‘पॅनल’ला समर्थन करायचे हे ठरविलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्वत् परिषदेत आसावरी दुर्गे या आपल्या उमेदवार असल्याचे मंचातर्फे सांगण्यात आले आहे. तर वसंत राठोड हे ‘यंग टीचर्स’कडून असल्याचा दावा करण्यात आला आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक