शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

या दिव्यांंग वृद्धाला ‘आधार’ देणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 11:57 IST

रामटेक येथील ७० वर्षीय मोतीराम येसनसुरे यांच्या डाव्या हाताला बोटं नाहीत. त्यामुळे त्यांना आधार कार्ड मिळाले नाही. परिणामी, बँक अधिकाऱ्यांनी त्यांचे बँक खाते बंद केले. त्यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देडाव्या हाताला बोटे नाहीतबँक खाते बंद केल्याने अनेक अडचणी

कैलास निघोट ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: शासनाने बँक खात्यापासून तर विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार अनिवार्य केले आहे. आधार कार्ड काढण्यासाठी दोन्ही हाताचे ठसे आवश्यक आहेत. मात्र, मुसेवाडी (ता. रामटेक) येथील ७० वर्षीय मोतीराम येसनसुरे यांच्या डाव्या हाताला बोटं नाहीत. त्यामुळे त्यांना आधार कार्ड मिळाले नाही. परिणामी, बँक अधिकाऱ्यांनी त्यांचे बँक खाते बंद केले. त्यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आता ते पुन्हा आधार कार्ड काढण्यासाठी शासकीय कार्यालयाचे खेटे घालत आहेत. एकीकडे, वृद्धाच्या हाताला बोटे नाही तर दुसरीकडे, प्रशासन नियमावर बोट ठेवत आहे. त्यामुळे यात दोषी तरी कुणाला ठरवायचे?मोतीराम येसनसुरे हे आदिवासीबहुल असलेल्या मुसेवाडी येथील रहिवासी होत. त्यांना दोन मुले व दोन मुली आहेत. ते जन्मत: अपंग असून, त्यांच्या डाव्या हाताला केवळ अंगठ्याच्या आकाराचे एकच बोट आहे. मध्यंतरी शासनाने नागरिकांचे आधार कार्ड काढण्याची मोहीम सुरू केली होती. मुसेवाडी येथेही आधार कार्ड शिबिर आयोजित केले होते. येसनसुरे या शिबिरात आधार कार्ड काढण्यासाठी गेले होते. त्यांच्या एका हाताला बोटे नसल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली. कारण आधार कार्ड काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाण्ो त्यांच्या दोन्ही हाताचे ठसे हवे होते.कालांतराने शासनाने आधार प्रत्येक बाबीसाठी अनिवार्य केले. बँक खात्यालाही आधार क्रमांक लिंक करणे अनिवार्य करण्यात आले. येसनसुरे यांच्याकडे आधार क्रमांक नसल्याने ते त्यांच्या बँक खात्याला लिंक करणार तरी काय? आधार क्रमांक लिंक न केल्याने बँक अधिकाऱ्यांनी त्यांचे बँक खाते बंद केले. त्यामुळे त्यांच्यासमोर नवीन समस्या निर्माण झाली. यासाठी ते सतत तालुक्याच्या ठिकाणाच्या (रामटेक) चकरा मारत आहेत. ते रोजमजुरीवर उपजीविका करीत असल्याने प्रवासावर खर्च करणार तरी किती, हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. मात्र, ही बाब गांभीर्याने घेऊन तोडगा काढण्यास प्रशासन तयार नाही.

मदतीला धावून आले ‘देवा’मोतीराम येसनसुरे हे आजवर एकाकी संघर्ष करीत होते. उतारवय आणि अपंगत्व असल्याने त्यांना अडचणी येतात. त्यांची ही समस्या कळताच मुसेवाडी ग्रामपंचायतचे सदस्य देवा डोंगरे हे त्यांच्या मदतीला धावून आले. आपण मोतीराम येसनसुरे यांना त्यांचे आधार कार्ड व क्रमांक मिळवून देऊ, असा विश्वासही देवा डोंगरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

यात माझा दोष काय?माझी सर्व कामे एकट्या आधार क्रमांकामुळे अडलेली आहेत. आधार क्रमांक नसल्याने माझे बँक खातेही बंद करण्यात आले. माझ्या डाव्या हाताला जन्मत: बोटं नाही, यात माझा दोष कोणता?- मोतीराम येसनसुरे, पीडित नागरिक.

टॅग्स :Healthआरोग्य