शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

या मस्तवालांना कोण रोखणार ? देशभक्तीच्या नावाखाली रस्त्यावर गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 01:15 IST

देशभक्तीच्या नावाखाली रस्त्यावर आरडाओरड करून, वेडीवाकडी वाहने चालवित काही मस्तवाल दुचाक्या चालकांनी शहरातील विविध भागात हैदोस घातला.

ठळक मुद्देआरडाओरड करत दुचाकीचालकांचा बेदरकारपणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशभक्तीच्या नावाखाली रस्त्यावर आरडाओरड करून, वेडीवाकडी वाहने चालवित काही मस्तवाल दुचाक्या चालकांनी शहरातील विविध भागात हैदोस घातला. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शहरात कडक पोलीस बंदोबस्त असूनही या मस्तवाल समाजकंटकांनी गोंधळ घातल्याने सर्वसामान्य नागरिक संताप व्यक्त करीत होते. त्यांचा बेदरकारपणा पाहून ‘या मस्तवालांना कोण रोखणार,’ असा संतप्त सवालही उपस्थित केला जात होता.गणतंत्र दिन, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येपासूनच उपराजधानीत दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे आनंदोत्सव साजरा केला जातो. चौकाचौकात तोरणे पताका लावून, ठिकठिकाणी स्वच्छता करून ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचेही आयोजन केले जाते. काही वर्षांपासून देशभक्तीच्या नावाआड काही मस्तवाल तरुणांचे टोळके सायलेंसर काढलेल्या दुचाक्या घेऊन मोठमोठ्याने आवाज करीत, घोषणाबाजी करीत टवाळक्या करीत फिरतात. हे भामटे बेदरकारपणे झिगझ्यागपद्धतीने, वेडेवाकडे वळण घेत दुचाक्या चालवितात. रस्त्याने मुली, महिला जाताना पाहून त्यांना जास्तच चेव येतो. ते एक्सीलेटर वाढवून, दुचाक्यातून फटाके फोडून घोषणाबाजी करतात. रस्त्याने जाणाऱ्या - येणाऱ्यांना कट मारतात. वृद्ध, ज्येष्ठ नागरिकांना वाकुल्या दाखविल्यासारखे करतात. पोलीस दिसले की तेवढ्या वेळेपुरते ते ठिकठाक राहतात. नंतर त्यांचा पुन्हा हैदोस सुरू होतो. गुरुवारी सकाळपासूनच अनेक भागात त्यांचा हा हैदोस सुरू होता. पावसाचे दिवस असल्यामुळे जागोजागी पाण्याचे डबके साचले होते. अशात स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निघालेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धांच्या जवळून जाऊन त्यांच्यावर चिखल उडविण्याचाही या समाजकंटकांनी प्रयत्न केला. शहरातील विविध भागात हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला होता. या मस्तवालांना कोण रोखणार, असा संतप्त सवालही या निमित्ताने उपस्थित झाला होता.८७५ वाहनचालकांवर कारवाईस्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येपासून वाहतूक पोलिसांनी कारवाईची विशेष मोहीम राबविली. दारुबंदी कायद्यानुसार पोलिसांनी ५५ जणांवर तसेच वाहतूक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ८७५ वाहनचालकांवर कारवाई केली.

टॅग्स :bikeबाईकnagpurनागपूर