शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
2
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
3
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
4
जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार? शिंदे गटाचे नेते म्हणाले, “रोहित पवारांमुळे पक्षाबाहेर...”
5
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
6
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
7
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
8
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
9
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
10
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
11
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
12
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
13
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
14
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
15
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
16
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले
17
Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय!
18
Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट
19
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
20
आम्ही जरांगे: दमदार भूमिकेत अजय पूरकर; साकारणार अण्णासाहेब पाटील यांची भूमिका

हिंगण्यात मेघेंना कोेण देणार टक्कर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:58 PM

लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीचे कृपाल तुमाने यांना जिल्ह्यात सर्वाधिक २५,९१९ मतांची लीड देणाऱ्या हिंगणा मतदार संघात भाजपाने यावेळी हॅट्ट्रिक करण्याचा संकल्प केला. गत दोन निवडणुकात झालेला पराभव विचारात घेता २०१९ ची निवडणूक राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई, नवा चेहरा देणार का?कॉँग्रेसनेही केला दावा

जितेंद्र ढवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणा : लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीचे कृपाल तुमाने यांना जिल्ह्यात सर्वाधिक २५,९१९ मतांची लीड देणाऱ्या हिंगणा मतदार संघात भाजपाने यावेळी हॅट्ट्रिक करण्याचा संकल्प केला. गत दोन निवडणुकात झालेला पराभव विचारात घेता २०१९ ची निवडणूक राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे.हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांनी पाच वर्षात मतदारसंघाचा मेकओव्हर केला. मेघे निवडून आले तेव्हा ते मतदार संघाचा विकास करतील का, अशा शंकाकुशंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र पाचही वर्ष त्यांनी मतदारांशी संपर्क ठेवला. मतदार संघात विकास कामांचा धडाका सुरु ठेवला. या काळात ते कोणत्याही वादात अडकले नाही. विनयशील स्वभावाने त्यांनी सर्वांना आपलेसे केले.गत पाच वर्षात तालुक्यात झालेल्या नगर परिषद आणि ग्राम पंचायत निवडणुकीत भाजपला येथे यश आले. हिंगण्याबाबत कॉँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका ठोस नसल्याने मेघेंना टक्कर देणाºया उमेदवाराची निवड करताना आघाडीच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. आघाडीत येथे जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला संधी मिळेल.या मतदार संघाचे राजकीय व सामाजिक चित्र लक्षात घेता, भाजपासाठी हा मतदार संघ ‘सेफ’ मानण्यात येतो. गत दोन निवडणुकीत येथे राष्ट्रवादीचा सातत्याने पराभव होत असल्याने, यावेळी या जागेवर काँग्रेसनेही दावा केला आहे. इकडी दुसरी टर्म मिळविण्यासाठी मेघे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.कॉँग्रेसकडून येथे गतवेळच्या उमेदवार कुंदा राऊत आणि प्रदेश सचिव मुजीब पठाण इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून येथे माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांचा दावा कायम आहे. मात्र नव्या चेहºयाला संधी देण्याचा विचार झाला तर राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय सेलचे नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष संतोष करवाळे येथे इच्छुक आहेत. या दृष्टीने त्यांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. २०१९ च्या निवडणुकीत हिंगण्यात माजी आमदार विजय घोडमारे यांची काय भूमिका असेल याकडेही राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.२०१४ च्या निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्याने राष्ट्रवादीला गेलेला मतदार संघ परत मिळविता आला नाही. काँग्रेसच्या कुंदा राऊत यांनी २० हजार ५७३ मते मिळवित राष्ट्रवादीचे रमेशचंद्र बंग यांना धक्का दिला. राऊत यांच्यामुळे बंग यांच्या मतांचा ग्राफ कमी झाला. बसपानेही येथे चांगली कामगिरी केली.बसपाचे भदंत महापंत महाथेरो यांनी १९ हजार ४५० मते मिळविली होती.त्यामुळे यावेळी येथे बसपाची काय भूमिका असेल याकडे लक्ष लागले आहे. मात्र कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि बसपाला टक्कर देत भाजपचे समीर मेघे यांनी ८४ हजार १३९ मते घेत हिंगण्याचा राजकारणाला नवी दिशा दिली. मेघे २००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत येथे भाजपची लीड वाढविली. २००९ मध्ये येथे भाजप-राष्ट्रवादीत थेट लढत झाली होती.राष्ट्रवादीचे रमेशचंद्र बंग यांचा ७०० मतांनी पराभव करीत भाजपचे विजय घोडमारे विजयी झाले होते. घोडमारे यांना ६५ हजार ३९ तर बंग यांना ६४ हजार ३३९ मते मिळाली होती. बसपाचे राजाराम पांडे यांनी ९,२६२ मते मिळविल्याने बंग यांच्या मतांचा ग्राफ कमी झाला. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही कॉँग्रेस आणि बसपाच्या भूमिकेवरच राष्ट्रवादीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आहे. मात्र बसपा आणि वंचित बहुजन आघाडीचा येथे उमेदवार कोण असेल हेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक