शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हिल मिस यू प्रफुल्ल बिडवई’

By admin | Updated: June 25, 2015 03:12 IST

आयुष्यात प्रगतीच्या शिखरावर जाऊन प्रचंड पैसे कमविण्याची संधी असतानादेखील काही व्यक्ती मात्र वेगळा मार्ग निवडतात.

नागपूरशी जुळले होते ऋणानुबंध : येथील मातीतून मिळाले निर्भीडतेचे संस्कारनागपूर : आयुष्यात प्रगतीच्या शिखरावर जाऊन प्रचंड पैसे कमविण्याची संधी असतानादेखील काही व्यक्ती मात्र वेगळा मार्ग निवडतात. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो व समाजावर होणारा अन्याय, जनतेची होणारी दिशाभूल यांच्यावर प्रकाश टाकण्यासाठी ते स्वत:ला समर्पित करतात. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल बिडवई हे देखील यातीलच होते. पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठे नाव झाल्यावरदेखील त्यांचे पाय जमिनीशी घट्ट जुळले होते. विदर्भातील मातीतील सुपुत्र असलेल्या बिडवई यांचे उपराजधानीशी वेगळेच ऋणानुबंध होते. म्हणूनच सातासमुद्रापार ‘अ‍ॅमस्टरडॅम’ येथे त्यांचे अचानक निधन झाल्याची बातमी कळल्यानंतर नागपुरातील त्यांच्याशी अथवा त्यांच्या लेखणीशी परिचित असलेल्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तोंडातून निघाले ‘व्हिल मिस यू डिअर प्रफुल्ल बिडवई’!उपराजधानीच्या मातीशी प्रफुल्ल बिडवई यांचे फार जवळचे संबंध होते. येथे त्यांचे अनेक मित्र तर होतेच. एका पत्रकारासोबतच ते विविध चळवळींशी जुळलेले कार्यकर्तादेखील होते. जगामध्ये अण्वस्त्रांच्या वाढत्या प्रमाणामुळे पर्यावरणाला धोका आहे हे त्यांचे स्पष्ट मत होते. पर्यावरण रक्षणासाठी व अण्वस्त्रांविरुद्ध जागृतीसाठी सुरेश खैरनार यांच्यासारख्या समविचारी लोकांना एकत्रित घेऊन ‘सीएनडीपी’ (कोअ‍ॅलिएशन फॉर न्यूक्लिअर डिसआर्ममेंट अ‍ॅन्ड पीस) या संघटनेची स्थापना केली होती. विशेष म्हणजे याची स्थापनाही नागपुरात झाली. येथील ‘इंडियन पीस सेंटर’ येथे २००० साली याची पहिली बैठक झाली. त्यांचा जन्म अमरावतीचा होता. सत्तरच्या दशकात तर ‘मागोवा गट’ तसेच इतर बऱ्याच चळवळींसाठी ते नागपुरातच राहायचे व येथूनच त्यांच्यामधल्या पत्रकाराची जडणघडण होत गेली. नागपूरच्या माध्यमातून अनुभवलेल्या विविध सामाजिक समस्यांना त्यांनी समर्पकपणे आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडले. (प्रतिनिधी)माझा मार्गदर्शक हरविला प्रफुल्ल बिडवई व माझे संबंध हे गेल्या ५० वर्षांपासूनचे म्हणजे विद्यार्थीदशेपासूनचे आहेत. बारावीनंतर त्यांनी ‘आयआयटी-पवई’त प्रवेश घेतला होता. परंतु अखेरच्या वर्षात ते तेथून परतले. अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात प्राचार्य असलेल्या त्यांच्या वडिलांनी खूप रागावले. परंतु बिडवई यांनी स्वत:ची भूमिका त्यांना समजावून सांगितली व ते पत्रकारितेसाठी मुंबईकडे रवाना झाले. विविध विषयांवर त्यांचा सखोल अभ्यास होता. सत्तरच्या दशकातील विविध चळवळींमध्ये ते सक्रिय होते. तेथीलच धडाडी व निर्भीडपणा त्यांच्या लेखणीतून उमटायचा. कमवलेला पैसा त्यांनी स्वत:पेक्षा विविध चळवळींना मुक्तहस्ते दान केला. माझे तर ते बौद्धिक मार्गदर्शकच होते. ‘सीएनडीपी’च्या बैठकीसाठी ते नेहमी नागपुरात यायचेच. काही महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत ऐनवेळी ते येऊ शकले नाही. पुस्तकाच्या प्रकाशनाची घाईगडबड असल्याने येऊ शकणार नाही हे त्यांनी कळविले. त्या बैठकीत त्यांची कमतरता प्रकर्षाने जाणवली व यापुढे ती नेहमीच जाणवेल.-डॉ.सुरेश खैरनार, जेष्ठ सामाजिक कार्यकर्तेप्रागतिक विचारसरणीचा पत्रकारपत्रकारिता नेमकी कशी करावी याचे उदाहरणच प्रफुल्ल बिडवई यांनी घालून दिले होते. देशातील अतिशय महत्त्वाचे ते पत्रकार होते. पण कधीही कोणाच्या दबावात आले नाही. प्रागतिक विचारसरणीला त्यांनी नेहमी प्राधान्य दिले. नागपुरशी शैक्षणिक दशेपासूनच त्यांचा संबंध आला होता. त्यामुळे उपराजधानीशी जुळलेला एक विचारवंत अचानक निघून गेल्याची खंत आहे.-डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी, ज्येष्ठ कवी-समीक्षकअभ्यासू पत्रकार अन् मित्र प्रफुल्ल बिडवई यांच्याशी विविध सभा अन् कार्यक्रमांच्या माध्यमातून संबंध आला होता. एक व्यक्ती म्हणून ते अतिशय मनमिळावू तर होतेच. परंतु सोबतच अभ्यासू, वैचारिक पठणीतील पत्रकार होते. समाजवादी दृष्टीकोनाचे त्यांचे विचार होते. महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही दबावाशिवाय ते पत्रकारिता करायचे व सत्य लेखणीतून मांडायचे. नागपुरशी त्याचा लहानपणापासून विविध माध्यमांतून संबंध राहिला आहे. त्यामुळे हे केवळ पत्रकारितेचेच नाही तर त्यांच्या अनेक मित्रांचे कधीही भरुन न निघणारे वैयक्तिक नुकसान आहे.-डॉ.रतिनाथ मिश्रा, भाकपपत्रकारितेतील स्तंभप्रफुल्ल बिडवई हे नाव घेतले की डोळ््यासमोर येते ती निर्भीड अन् सत्याची बाजू घेणाऱ्या पत्रकाराचा चेहरा. बिडवई हे त्यांच्या लेखणीमुळे विचारवंतांमध्ये सुपरिचित होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले तरी चळवळींशी त्यांची नाळ जुळलेली होती. इंदिरा गांधी असो किंवा नरेंद्र मोदी, बिडवई यांनी त्यांच्यावर निर्भिडपणे टीका करत भाष्य केले. कुठलाही आडपडदा नाही अन् कुठलाही बडेजावपणा नाही असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. ते डाव्या विचारसरणीचे असल्याचे म्हटल्या जात होते. परंतु डाव्या पक्षांवरदेखील त्यांनी लेखणीच्या माध्यमातून जोरदार टीका केली होती. विदर्भाच्या या सुपूत्राला देश मुकला आहे.-उमेश चौबे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते