शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

मिलिटरी आॅपरेशनची माहिती देणारा कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:49 IST

मिलिटरी इंटेलिजन्समधून मेजर पंकज बोलतो, तुमच्याकडे आयएसआय एजंट पकडण्यासाठी आॅपरेशन करण्यात येणार असल्याची माहिती देऊन सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या पंकज येरगुडेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तिकडे कांगडा (हिमाचल प्रदेश) मध्ये त्याला अटकही झाली आहे. मात्र, ज्याने फोन केला तो आवाज आणि पंकजच्या आवाजात साम्य नाही. त्यामुळे पंकजच्या मोबाईलचा गैरवापर करण्यात आला किंवा मोबाईल क्रमांक हॅक करण्यात आला की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. परिणामी एमआय आॅपरेशनला नवी कलाटणी मिळाली आहे.

ठळक मुद्देपुन्हा नाट्यमय कलाटणी : पोलिसांची दिशाभूल करणारा आवाज पंकजचा नाही!

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिलिटरी इंटेलिजन्समधून मेजर पंकज बोलतो, तुमच्याकडे आयएसआय एजंट पकडण्यासाठी आॅपरेशन करण्यात येणार असल्याची माहिती देऊन सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या पंकज येरगुडेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तिकडे कांगडा (हिमाचल प्रदेश) मध्ये त्याला अटकही झाली आहे. मात्र, ज्याने फोन केला तो आवाज आणि पंकजच्या आवाजात साम्य नाही. त्यामुळे पंकजच्या मोबाईलचा गैरवापर करण्यात आला किंवा मोबाईल क्रमांक हॅक करण्यात आला की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. परिणामी एमआय आॅपरेशनला नवी कलाटणी मिळाली आहे.गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका धार्मिक स्थळाच्या परिसरातून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसोबत सॅटेलाईटद्वारा वारंवार संपर्क करण्यात येत असल्याचा फोन गणेशपेठ पोलीस ठाण्यात आला होता. हा फोन करण्यासाठी वापरण्यात आलेला मोबाईल क्रमांक पंकज येरगुडेचा आहे. फोन करणारानेही स्वत:चे नाव मेजर पंकज सांगितले होते. त्याच्या या फोनने केवळ गणेशपेठ पोलीसच नव्हे तर शहरासह राज्यातील सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर ८ नोव्हेंबरच्या रात्री एमआयने भालदरपुरा येथून दोन संशयितांना तर ९ नोव्हेंबरला एका पाकिस्तानी नागरिकाला ताब्यात घेतल्याची माहिती सर्वत्र पसरली. नागपूर पोलिसांनी या वृत्ताचे खंडण केले . दरम्यान, या वृत्ताने सर्वत्र खळबळ उडाली असल्यामुळे एमआयनेही त्याची चौकशी केली. ज्या भ्रमणध्वनीवरून फोन करण्यात आला त्याचे लोकेशन हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे दिसले. ज्याच्याकडे हा मोबाईल होता, तो पंकज येरगुडे सैन्यदलात रसद पुरवठा विभागाच्या योल येथील छावणीत शिपाई पदावर कार्यरत आहे. त्याला एमआयकडून अटक करण्यात आली. इकडे नागपूर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर एमआयच्या अधिकाऱ्यांनी नागपूर पोलिसांशी संपर्क करून पंकज व संबंधित अधिकाऱ्यांचे बोलणे करून दिले. मात्र, पूर्वी आलेला आवाज आणि या आवाजात साम्य नसल्याचे जाणवले. त्यामुळे पंकजच्या मोबाईलचा गैरवापर झाला किंवा मोबाईल क्रमांक हॅक करून दुसऱ्या व्यक्तीने नागपूर पोलिसांची दिशाभूल केली असावी, अशी शंका निर्माण झाली आहे.परिणामी या प्रकरणाला पुन्हा नाट्यमय कलाटणी मिळाली असून, पोलीस आता त्याची चौकशी करीत आहेत. या संबंधाने पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, पोलीस पथक हिमाचल प्रदेशला देखिल रवाना करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTerrorismदहशतवाद