शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

तूर डाळींच्या किमतीवर नियंत्रण कुणाचे? सामान्यांची खरेदी थांबली

By मोरेश्वर मानापुरे | Updated: May 4, 2024 22:39 IST

मागणी व पुरवठ्यात तफावत : साठेबाजांवर कारवाईची ग्राहक संघटनांची मागणी, मे महिन्यात १३ रुपयांची वाढ

 

नागपूर : मागणी आणि पुरवठ्यात कमालीची तफावत असल्यामुळे यंदा तूर डाळीचे भाव वाढले आहेत. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात किलोमागे १० ते १३ रुपयांची वाढ झाली आहे. कॉर्पोरेट कंपन्या आणि घाऊक व्यापाऱ्यांनी कच्चा आणि प्रोसेस तूर डाळीचा मोठा साठा केल्याचा ग्राहक संघटनांचा आरोप असून साठेबाजांवर कारवाई करण्याची मागणी आहे. या निमित्ताने दरवाढीवर नियंत्रण कुणाचे? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.केंद्र सरकारच्या सर्व प्रयत्नानंतरही डाळींचे भाव वाढतच आहेत. विशेषत: तूर डाळीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने स्टॉक लिमिट आणल्यानंतरही भाव कमी होताना दिसत नाही. त्याचा फटका गरीब व सामान्यांना बसला असून त्यांनी खरेदी थांबविली आहे. गोडावून, कोल्ड स्टोरेज, स्टॉक रजिस्टरची तपासणीकिमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने डाळींच्या साठवणुकीवर मर्यादा आणली. पण सरकारी अधिकारी निवडणुकीत व्यस्त असल्याचा फायदा व्यापारी घेत आहेत. याच कारणांनी एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात तूर डाळीचे दर दर्जानुसार १६० ते १७५ रुपयांवर पोहोचले आहेत. सोबतच हरभरा आणि मूग डाळीच्या किमतीही तेजीत आहेत. आणखी दरवाढीची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. तूर डाळींचा साठा वेबसाइटवर अपलोड करण्याचे आवाहनडाळींच्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने कॉर्पोरेट कंपन्यांसह घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांना वेबसाईटवर तूर आणि तूर डाळींचा साठा अपलोड करण्यासह स्टॉक रजिस्टर भरणे बंधनकारक केले आहे. शिवाय अपलोड केलेल्या स्टॉक रजिस्टरचे प्रिंट आऊट दुकानात ठेवायचे आहे. केंद्र आणि राज्याच्या अन्न धान्य वितरण अधिकाऱ्यांना तपासणीदरम्यान द्यायचे आहे.तूर डाळीची आयाततुरीचे उत्पादन भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशात होते. जगात डाळी उत्पादनात भारताचा वाटा २५ टक्के वाटा आहे. पण मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत आहे. मागणी पूर्ण करण्यासाठी तूर डाळ आयात करावी लागते. प्रामुख्याने मसूर, तूर आणि उडीद म्यानमार, पूर्व आफ्रिकन राष्ट्रे, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा येथून आयात केली जाते.डाळींचे भाव (प्रति किलो):डाळ एप्रिल महिना मे महिनातूर डाळ १४८-१६२ १६०-१७५हरभरा डाळ ६४-७४ ७४-८४उडद मोगर १२२-१४५ १२२-१४५मूग मोगर ९५-१०० १००-१०५मसूर डाळ ८०-८५ ८०-८५

मुख्यत्वे तूर डाळीच्या वाढत्या किमतीमुळे व्यवसायावर परिणाम झाला असून गुंतवणूक वाढली आहे. शिवाय साठ्यावर मर्यादा आल्या आहेत. गेल्यावर्षी दर्जेदार तूर डाळ १०० रुपयांच्या आत होती. सध्या कळमन्यात वऱ्हाडी फटक्याचे प्रति किलो दर १७५ रुपयांवर गेले आहेत. दरवाढीमुळे ग्राहकांची खरेदी कमी झाली आहे.रमेश उमाठे, धान्य व्यापारी, कळमना न्यू ग्रेन मार्केट.

टॅग्स :nagpurनागपूर