लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आनंदात आपल्या बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटून गावाकडे परत जात असलेल्या भावावर काळाने झडप घातल्याची घटना नरखेड रेल्वेस्थानकावर घडली. आमला पॅसेंजरमध्ये चढत असताना पाय घसरल्यामुळे कटून त्याचा मृत्यू झाल्यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली.मो. इमरान मो. इब्राहिम (२२) रा. पांढुर्णा असे मृताचे नाव आहे. इमरानच्या बहिणीचे लग्न २३ डिसेंबरला आहे. त्यामुळे नातेवाईकांना पत्रिका वाटण्यासाठी तो नागपुरात आला होता. पत्रिका वाटून झाल्यानंतर आमला पॅसेंजरने तो पांढुर्णाला परत जात होता. नरखेड रेल्वेस्थानकावर गाडी थांबल्यानंतर तो पाणी पिण्यासाठी रेल्वेस्थानकावर उतरला. गाडी सुटल्यानंतर तो गाडीत चढत असताना त्याचा पाय घसरला आणि तो गाडीखाली येऊन गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही घटना नरखेड रेल्वेस्थानकाजवळ किलोमिटर क्रमांक ९५६/२३ येथे घडली. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग सहायक उपनिरीक्षक सुशिल पांडे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांनी इमरानच्या कुटुंबीयांना दिल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. दहा दिवसानंतर घरात लग्न असताना अचानक कुटुंबातील सदस्याचाच मृत्यू झाल्यामुळे सर्वांवर दुखाचे सावट पसरले आहे.
बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटताना भावाचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 20:43 IST
आनंदात आपल्या बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटून गावाकडे परत जात असलेल्या भावावर काळाने झडप घातल्याची घटना नरखेड रेल्वेस्थानकावर घडली. आमला पॅसेंजरमध्ये चढत असताना पाय घसरल्यामुळे कटून त्याचा मृत्यू झाल्यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटताना भावाचा मृत्यु
ठळक मुद्देनरखेड येथील घटना : २३ डिसेंबरला आहे बहिणीचे लग्न